खुप दिवसांनी कुणीतरी रागवलं मला आज..अचानक वाटलं..आपण हे फ़ीलींग विसरुनच गेलो होतो की.. लहानपणी हे करु नकोस, ते करु नकोस पासुन बर्याच गोष्टींसाठी मी रागवणं खाल्लंय...पण आताशा सगळंच काही परफ़ेक्ट करण्याच्या नादात मी कुठलीही चूक केली नाही आणि पर्यायाने कुणी कुणी म्हणुन रागवलं नाही..कसं मिळमिळीत वाटत होतं आत्तापर्यंत असं वाटायला लागलं आणि कुठेतरी त्या रागवणार्या माणसाचे माझ्यातल्या खोडकर मुलीने आभार मानले... आजचं रागावणं स्पेशल या करीता की, दिवाळीच्या सुट्टीचा याच्याशी थेट संबंध आहे...दिवाळीत नवीन ड्रेस, फ़टाके फ़राळ या सोबत कुठल्याही छोट्याश्या खोडीसाठी आवडत्या मामा किंवा मावशी कडुन डोक्यावर पडलेला टप्पू पण माझ्यासाठी स्पेशल असायचा तसंच हे झालं योगायोगाने... लहानपणी कुणीही रागवलं की, लगेच माझे डोळे भरुन यायचे, नाक लाल व्हायचं आणि गोबरे गाल पार उतरुन जायचे. कुणासमोर गेलं अश्या अवतारात की लगेच सगळी विचारपूस होत असे आणि मला खुप अवघडल्यासारखं वाटत असे. मग हे अवघडलेपणच येऊ नये अश्या प्रयत्नात मी चुका करायलाच विसरले...आणि मोठी झाले..आज मात्र माझं बालपण परत येऊन मला मी मोठी झाल्याचं सांगुन गे...
गप्पागोष्टी, खाद्यभ्रमंती आणि सगळ्या मनाला भिडलेल्या गोष्टींची बखर!