Skip to main content

संवाद....

आज काहीतरी वेगळं लिहावं म्हणतेय..
ह्म्म! काय वेगळं ?आज सकाळचा वेळ कसा मॆनेज केला? खायला काय केलं हेच ना?
नाही..वेगळं म्हणजे खुप वेगळं...एकदम फ़्रेश...मनाला खुप आनंद देणारं..
मग बाकी जे आत्ता करतेय्स ते आनंद देत नाही वाट्टं..
असं नाहिए गं..पण सगळं छान चाललं असतांना लागत असलेली चुटपूट फ़ार विचीत्र असते बघ..
तुला ना उगाच नसत्या गोष्टींबद्दल विचार करायची सवय आहे..
असंच म्हण हवं तर..पण त्या नसत्या गोष्टीच खुप महत्वाच्या आहेत असं वाटतंय मनापासुन..
चेक कर स्वतःला काहीतरी गडबड आहे नक्की..
हो आहे ना गडबड माझं मी पण समजण्याचे हेच सिम्प्टम्स आहेत कदाचित..
"मी पण" हे काय नवीन??
नवीन नाही जुनंच..पण नव्याने सुचलेलं..
काय नवीन काय जुनं? सगळं गुंडाळुन ठेवावं लागतं पोटभरीच्या भानगडीत..
खरंय गं तुझं मी पण असाच विचार करत होते..आणि बर्यापैकी जमतही होतं सगळं..
पण मग मध्येच काय ही नवी भानगड?..नव्याची जुन्याची..
अगदी घामाघुम झालं असतांना थंड हवेची झुळूक कशी वाटते..सुखदायी..तसेच वाटतायत मला माझे नवीन विचार..नवे..जगण्याला अर्थ देणारे..
आता अजुन काय अर्थ शोधायचाय? जे काही हवं होतं ते मिळालंय..
म्हणुन शोध संपला असं गृहीत धरलंस नं तू? तेच खरं तर चूक आहे...
शोध संपला असं नाही..पण आता संसाराच्या रगाड्यात वेळ्च नाहीए गं..
काढ मग वेळ..स्वतःसाठी..झोकून दे स्वतःत..स्वतःला. तेव्हा कुठलंही बंधन पाळू नकोस..कुठलंही नातं नं ठेवता..फ़क्तं मुग्धा हो..
हे असं केल्याने काय होईल..
मनावरचं मळभ दूर होईल..आणि तुझ्या रोजच्या गोष्टीतही तुला रस येईल..
मला नाही वाटत..
माझ्यावर विश्वास ठेव..अशी जादु होते आणि आपण अंतर्बाह्य बदलून जातो..
पण माझ्या बदलण्याने माझी मी स्वतः जोपासलेली नाती???
अजुन टिकतील..प्रश्न आहे तो तुझा दृष्टिकोन बदलण्याचा..
मी वाघाचं कातडं घालुन असं किती दिवस माझा बचाव करणारे?
उलट तू वाघ आहेस आणि तू त्या बोकडाचं कातडं घातलंयस..
काहीतरीच काय?
हो अगं माझ्या बोलण्याकडे नीट लक्ष दे..तू स्वतःला विसरलीएस..
हो ते तर आहेच..पण घरातले सगळे आनंदात आहेत..कदाचित मी सगळं विसरुन त्यांचं करतेय म्हणुन
असं नाहीए...त्यांना खरा आनंद कधी होईल माहीतीए? जेव्हा तू आनंदी राहशील..सगळं मनापासुन करशील..
आताही मनापासुनच करतेय ना?
हो का? मनापासुन करतेयस?
म्हणजे हो.....नाही कदाचित..
किती दिवस झालेत..मस्तंपैकी गाणी ऐकुन?
बरेच दिवस गं...
आणि छानपैकी एकट्यानेच फ़ेरफ़टका मारुन..?
झालेत बरेच दिवस..
हेच वरचे दोन प्रश्न स्वतःला विचारत रहायचे..उत्तर आपल्या आतूनच येतं..
काल मी एक गम्मत केली...
एकटीच निघाले फ़िरायला....खुप छान वाटत होतं.. फ़िरता फ़िरता माझी नजर एका मेहंदी वाल्याकडे गेली....त्याच्याकडुन मी मस्तं हातभर मेहेंदी काढुन घेतली..एवढं फ़्रेश वाटलं म्हणुन सांगू...
तुलाही खुप आवडते नं मेहंदी?
हो गं..खुप म्हणजे खुप..
मग आता काढायचा वेळ स्वतःसाठी..आणि मस्तं हातभर मेहंदी काढायची..रंगायचं मेहंदीच्या आणि स्वतःच्या रंगात... आत्मरंगात...

Comments

  1. आयुष्याचा खरा आनंद घ्यायचा असेल तर आत्मरंगात थोड रंगलच पाहिजे!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दे नेवर रिअली केअर्ड अबाउट हिम!!

काल व्हिएच १ चेनेल वर सगळे विडिओज बघितले..आजवर मी त्याचे एक दोन विडिओज च पाहिले होते..जे काही त्याच्याबद्दल माहित होते ते फ़क्त वर्तमानपत्राद्वारे, बातम्यांद्वारे.. सगळे लोकं म्हणतायत त्याप्रमाणे माझी आणि ईंग्रजी गाण्यांची ओळख मायकल च्या गाण्यांनी नाही झाली..मी कदाचित खुप लहान होते जेव्हा त्याचे अल्बम्स रिलिज झाले...पण तो लक्षात राहीला त्याच्या मुंबईच्या वारी ने.. त्याला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची संख्या पाहुनच तो नक्कीच काहितरी स्पेशल असावा असे मात्र वाटुन गेले.. त्याचं "दे डोन्ट रिअली केअर अबाउट अस" गाणं मात्र लक्षात राहीलं.. काल पाहीलेलं एबीसी हे त्याने वयाच्या ११ व्या वर्षी गायलेलं गाणं तर केवळ अप्रतिम..वयाचं ११ वर्ष जेव्हा मुलं स्टेजवरही जायला घाबरतात, तिथे हा अगदी आरामात परफ़ोर्म करत होता...नाचत होता..अगदी लिलया गात होता... http://www.youtube.com/watch?v=MYx3BR2aJA4&feature=related त्याचं मी काल पाहिलेलं त्याचं प्रत्येक गाणं मला पुन्हा एकदा या कलाकराची नव्याने ओळख करुन देत गेलं.... "Man In The Mirror" : - I'm Gonna Make A Change, For Once In My Li...

अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय ..

प्रिय आईस, २००९ संपायला अजुन १ दिवस बाकी आहे आणि सगळे विचारतायत कसं साजरा करणार? तू पण असंच म्हणायचीस..की अगं ३१ डिसेंबर कुठल्याही वर्षाला एकदाच येतो..तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणुन त्या वर्षाला आनंदाने निरोप द्यायचा..पण १ जानेवारीला सकाळी लवकर उठुन दिवस साजरा करायचा..हम्म!! तुझं सांगणं नेहमीच पटायचं आणि आजही पटतं..मोठ्ठं झाल्यावर सुध्दा.. हे अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय गेलं..म्हणजे तुझ्या जिवंत अस्तित्वाशिवाय.. तू पुढच्या प्रवासाला लागली असशीलच गं पण तरीपण मला तुझा वावर अजुनही जाणवतो अपवाद फ़क्तं मी दिवाळीत बेसनाचे लाडु केले तेव्हाचा...मला काहीच सांगितलं नाहीस आणि ते लाडु खुपच खराब झाले...थोड्या वेळ मीच घाबरले होते की का तू असल्याचं जाणवत नाहिए? पण नंतरचा प्रत्येक दिवस तुझ्या असण्याची हमी देतच होता... बरेच बदल झालेत यावर्षी...माझं लग्न झालं हा सगळ्यात मोठा बदल...लग्न झाल्यावर बाबांना आणि मला तुझ्या आठवणीने खुप भरुन आलं. छकु नेहमीसारखीच शांत होती..सगळ्यांनाच जाणवली तुझी कमतरता पण कुणी आम्हाला वाईट वाटेल म्हणुन बोलुन दाखवलं नाही..चंचल मावशीने "माय मरो मावशी जगो" ही म्हण स...

इरुवर - तमिळ चित्रपटांचा मेरुमणी

तमिळ सिनेमा हा विषय मी ब्लॉगवर कधीच लिहिलेला नाही. आता १० वर्षे झालीत मद्रास मध्ये आणि बऱ्यापैकी तमिळ पण बोलता येतं, कळतं, म्हणून ठरवले की नेहेमी भाषांतर केलेल्या या नव्या जुन्या चित्रपटाबद्दल लिहावे. तामिळ ही खूप गोड़ आणि ओघवती भाषा आहे, अर्थात कुठल्याही भाषेसारखीच. पण या भाषेचा जन्म प्राकृत भाषेमुळे झाला. लिपी अतिशय सोपी असली तरी शब्द आणि त्याचे उच्चारण कठीण आहे. थोडे अजूनही कळत नाहीच ;) काही दिवसांपूर्वीच "इरुवर" चित्रपट पाहिला. इरुवर - म्हणजे दोघे - ऐश्वर्या चा पहिला चित्रपट म्हणून फेमस आहेच पण जयललिता, करुणानिधी आणि एमजीआर या तीन पूर्व मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. मणी रत्नम चं दिग्दर्शन, ए आर रहमान चं संगीत. अजून काय हवे? मल्याळी अभिनेता मोहनलाल ( एमजीआर), ऐश्वर्या राय ( एमजीआर ची पूर्व पत्नी आणि जयललिता ) च्या भूमिकेत, प्रकाश राज ( करुणानिधी ) च्या भूमिकेत, रेवती आणि तब्बू या करुणानिधींच्या पत्नी. १९५० मधले सेट्स आणि त्याच काळचा प्लॉट. संतोष सिवन ची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तेव्हा संतोष सिवन अतिशय नवखे असतील पण तरीही खूपच सुंदर चित...