१९९६ चा काळ होता तो. एकच टीव्ही चॅनेल तेव्हा तुफान प्रसिद्ध होतं ते म्हणजे झी टीव्ही. बऱ्याच मालिका हिट पण होत्या. माझ्या टीव्ही प्रेमाची सुरुवात झाली शांती या मालिकेने, स्वाभिमान आणि मग एखाद वर्षाने देख भाई देख. या मालिकांनी डेली सोप चं दुकान उघडलं होतं. मग झी वर तारा, बनेगी अपनी बात, हम पांच, आणि असे अनेक धारावाहिक सुरु झाले. वेळ पण लागोपाठ असायची, संध्याकाळी अभ्यास करून झाला की बस सुरु व्हायचे हे कार्यक्रम. थोडे मोठे झाल्यावर एक खूप साधी मालीका सुरु झाली सैलाब नावाची. रेणुका शहाणे, सचिन खेडेकर, प्राजक्ती देशमुख हे प्रमुख कलाकार, रोहिणी हट्टंगडी, निनाद कामत आणि बाकीचेही दर्जेदार कलाकार यात होते. साधी स्टोरी पण सगळ्यांचा अभिनय मात्र लाजवाब. प्रत्येक एपिसोड असा वाटायचा की अगदी बाजूलाच घडतंय सगळं. शिवानी आणि रोहित चं एकमेकांवरचे प्रेम, त्याला होणारा विरोध आणि पर्यायाने शिवानी चे लग्न अविनाश ( महेश ठाकूर) सोबत असा साधा प्लॉट होता. पण घेतलेली सेटिंग, प्रत्येक एपिसोड चे डायलॉग म्हणजे एकदम दिल खल्लास. रेणुका शहाणे, शिवानी च्या भूमिकेत छान वाटली पण सगळ्य...
गप्पागोष्टी, खाद्यभ्रमंती आणि सगळ्या मनाला भिडलेल्या गोष्टींची बखर!