तिने त्याला पाहीलं अगदी पहील्यांदा, ओझरतंच. ..मळकीच टी शर्ट घातलेला आणि घामघुम झालेला तो..तिला आवडला? कळलं नाही तिला तिचंच... क्लासमध्ये रोज उशीरानेच होणारी त्याची एंट्री..पण त्याच्या त्या उशीराच येण्याची वाट पाहणारी ती..तो दारात आल्या आल्या तिच्या काळजाचा ठोका चुकायचा... शेवटच्या बेंचवर बसुन सिंसिअरली क्लास अटेंड करणा~यापैकी तो, ती आणि आणखी काही मुलं...त्याच्या रेखीव बोटांना त्याच्या नकळत न्याहाळणारी ती..हरवुन बसायची स्वतःला.. त्याच्या येण्याने तिच्या मनातला गुलमोहर बहरला होता, त्याच्यासोबतचा प्रत्येक क्षण आपण आयुष्यात अनेकानेक वेळा अनुभवावा असं तिला सारखं वाटायचं..पण हे नक्की का होतंय याचा मात्र तिला अजिबात पत्ता लागत नव्हता... त्याचा सहवास तिच्यासाठी एक समृध्द करणारा अनुभव असायचा. आपली सगळी स्वप्न आपण याच्यासोबतंच पूर्ण करु शकु असा विश्वास तिला कोण जाणे कुठुन येत असे. एक अशीच संध्याकाळ, सुर्याने आपल्या सुंदर रंगाची उधळण करुन फुलवलेली, ती आपल्या घराच्या गैलरीत संतूरवर वाजवलेला राग यमन ऐकत होती. वाफ़ाळत्या चहाच्या घोटाबरोबर त्याची स्वप्ने पाहण्यात रंगून गेली होती. द...
गप्पागोष्टी, खाद्यभ्रमंती आणि सगळ्या मनाला भिडलेल्या गोष्टींची बखर!