Skip to main content

Posts

Showing posts from November, 2009

तेरा होने लगा हुं....

एखाद्या गाण्यानी वेड लावायची ही काही पहीलीच वेळ नव्हे..याआधीही असंख्य गाणी आवडली अगदी वेड्यासारखी पुन्हा पुन्हा ऐकली, गळ्यात उतरवली, मैत्रीणींसमोर गायली, सख्यासाठी गुणगुणली. पण नव्या गाण्यांमध्ये बर्याच दिवसांनी मला हे गाणं खुप आवडलं. प्रत्येक सूर प्रत्येक शब्द अगदी थेट काळजाचा ठाव घेतो. मी हा चित्रपट पाहीला नाही.. ह्या गाण्याच्या क्लिप्स पण बघितल्या नाहीत पण कोण जाणे एक एक शब्द इतका छान गुंफ़लाय की आपल्याला आतवर कुठेतरी गाणं ऐकल्याचं समाधान मिळत राहतं.. सख्याचं आपल्या प्रेयसीला साद घालणं आणि तिचंही त्याचं प्रेम स्विकार करतांना " माझंही तुझ्यावर प्रेम आहे" हे सांगणं मला खुप भावलं. अतिफ़ अस्लम चा आवाज आणि त्याचा प्रत्येक स्वर एखाद्या प्रेमात पडलेल्या मुलीला तिच्याच प्रियकराचा वाटावा इतका नेमका आहे. अलिशाचा आवाज एकदम सेंशुअस. गाण्याची सुरुवातच मुळी अप्रतिम... Shining in the setting sun like a pearl upon the ocean come on feel me Girl feel me Shining in the setting sun like a pearl upon the ocean come on heal me Girl heal me हे ऐकुन तर सुर्यास्ताच्या वेळीचा समुद्राला सुखावण...

मी हरवली आहे....

पूर्वीची सकाळ वेगळी असायची. प्रसन्नतेला आपल्या कवेत घेत दिवस सुरू करायचा तोच मुळी आपल्या शर्थीवर प्रत्येक क्षण जगण्याच्या ऊर्मीसकट. वाफाळलेल्या चहाचे घोट गैलरीत निवांत उभं राहून स्वतःच्याच सोबतीत घशात रिचवायचे. खूपच भूक लागली असेल तर भल्या मोठ्या बर्गर ला आपल्या तोंडाची वाट मोकळी करून द्यायची फारशी डाएट वगैरे ची भिती नं बाळगता. सगळ्या गोष्टीची शोधाशोध करत तयारी करायची आणि १० मिनिटे रोज उशीराच कामावर जायचं, दुसऱ्या दिवशीही तेवढंच उशीरा जायचं हे ठरवून, अजिबात वाईट नं वाटू देता. कँटीनमध्ये मस्तं पैकी जेवण हादडून "आज मूड नही है" असं रोजच म्हणत कामाला उद्यावर टाकायचं आणि नेटवर एखादं गाणं शोधून डाउनलोड करायचं, ऐकण्याची तलब आली म्हणून. दुपारी ४ च्या सुमारास प्यायचा एक फक्कड गरम चहा..तोवर ह्याच्याशी गप्पा मारायच्या, माझं काय चाललंय यापासून तो अगदी अनभिज्ञ. त्याने पाहिलेली मी ही अशीच एखाद्या ब्रेकमध्ये. संध्याकाळी घेऊन फिरायचं कधी गप्प, कधी शांत तर कधी समुद्रासारखं मन....कधी कुठल्या मॉल मध्ये तर कधी निवांत बगिच्यात..आणि फोन करायचा त्याला तुझी आठवण येतेय म्हणून...अतिशय आर्त होऊ...