शुक्रवार संध्याकाळची वेळ, संपूर्ण आठवडा धावपळीत गेलेला, एका मीटिंग वरुन येतांना आता घरी जाऊन चहा करण्यापेक्षा संगीता मधे छानपैकी कॉफी घेऊ असा विचार करत मी आणि माझी बहिण संगीताजवळ येऊन ठेपलो. चेन्नई मधे 10 वर्षे झालीत आणि अलवारपेट, आर ए पुरम मधे राहायला येऊन 2-3 वर्षे. चेन्नई मधे आल्यावर "अरे किती तो भात खायचा?" "कंटाळलो बुवा भाताला!" वगैरे दुषणं मी कधीच दिली नाहीत कारण माझ्या मते चेन्नई हे शाकाहारी लोकांसाठी अतिशय अनुकूल खाद्यसंस्कृती असलेलं शहर आहे. गरज असते ती ही संस्कृती समजून घेण्याची. जशी मी चेन्नईत आले तसे माझ्या सासऱ्यांनी मला मैलापुर मधल्या अतिशय प्रसिद्ध अश्या मेस मधे नेले. त्यांना भेटण्यासाठी आम्ही कर्पगंबाल मेस मधे गेलो, तेव्हाची जूनी मेस..जुने बसायचे बाकं, एम् एस अम्मांचे सुप्रभातम आणि अप्पांनी ऑर्डर केलेले पोंगल, वडा, सांबर अजूनही माझ्या लक्षात आहे. नंतर गरोदर असतांना कीरई अड़ै खायचे डोहाळे पण मी तिथेच जाऊन पुरवले.अर्थात कुठे गेल्यावर काय खायचे हा संस्कार माझ्यावर बऱ्यापैकी माझ्या नवऱ्यानी केला. चेन्नईमधे होटेलिंग हा प्रकार फक्तं पनीर आणि नान पुरता म...
गप्पागोष्टी, खाद्यभ्रमंती आणि सगळ्या मनाला भिडलेल्या गोष्टींची बखर!