जरा उशिराच का होईना, मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. अख्खा महाराष्ट्र जिथे मकर संक्रमण आणि उत्तरायण अनुभवत असतो तिथे थोड्या दूरवर ;) म्हणजे आपल्या तामिळनाडूमध्ये कापण्या सुरु झाल्या असतात आणि पोंगल चा सण अगदी दिवाळीसारखा थाटामाटात साजरा केला जातो. उसाचे ढीग, ओल्या हळदीचे धांडे आणि शेतातून नुकताच आलेला भात यासगळ्यांनी मन आणि घर अगदी भरून जातं. पोंगल म्हणजे तामिळ लोकांची दिवाळी असे म्हणायला हरकत नाही. दिवाळी हे लोक अगदी एकंच दिवस साजरा करतात. पण पोंगल मात्र ४ दिवसांचा असतो. भोगी , थई पोंगल, माटू पोंगल, काणूम पोंगल असे चार दिवस सगळीकडे सुट्टी असते, सगळे आपापल्या गावी जातात म्हणजे चेन्नई हुन. तर असा हा पोंगल. पोंगल हे खरेतर एका पदार्थाचे नाव आहे. पोंग म्हणजे उतू जाणे. उतू जाणे म्हणजे समृद्धीचे लक्षण मानले जाते आणि पोंगल करतांना वरचे फेसाळलेले पाणी उतू जाऊ देतात पोंगल च्या दिवशी आणि पोंगालो पोंगल असे म्हणतात. मार्गळी महिना संपून थई महिना सुरु झाला म्हणूनही पोंगल ला थई पोंगल असे म्हणतात. भोगी च्या दिवशी सकाळी भयंकर धूर होता आकाशात, जुन्या वस्तू जाळून घर स्वच्छ केल्या जाते ह्...
गप्पागोष्टी, खाद्यभ्रमंती आणि सगळ्या मनाला भिडलेल्या गोष्टींची बखर!