गेले काही दिवस, सतत कार्टन्स मधे भरुन आणलेलं घर लावणं सुरु होतं. घर शिफ्टिंग ची गम्मत असते.. आपण पुष्कळ गोष्टी पुन्हा जगत असतो.. जुन्या घरात बरेच कार्यक्रम झाले....माझी लेक चालायला लागली, बहिणी चे लग्न झाले, नणंदेचे लग्न झाले.... आणि बरेच काही आयुष्यातले महत्वाचे टप्पे आम्ही त्या घरात पूर्ण केले. स्पेशल होतेच ते घर, आणि मोठे होते खूप, छान जाईचा वेल, मधुमालतीचा वेळ आणि बरीच झाडे. विशेष म्हणजे पारिजातक... मधू मालती जाई आणि पारिजातक मध्ये मोगरा आणि यल्लो बेल्स नवीन घरात जायचे जायचे करत खूप घालमेलही झाली..पण वाटले नाही, की जुने सोडू नये.. हाच एक शकुन समझला आणि बस्स सामान बांधायला लागले... ५ वर्षे मला तरी खूप मोठा कालावधी वाटतो.. मी खूप ऑर्गनाइज्ड वगैरे अजिबात नाही... वेंधळी जास्त आहे... मला मुळात कामे करायचा महा कंटाळा असायचा लहानपणी.. आई कशीतरी माझ्याकडून कामे उरकून घेई.. हळूहळू तिला लक्षात यायला लागलं की मला घरची कामे सांगणे म्हणजे तिचा वेळ घालवणे आहे..मग तिने बाहेरची कामे सांगायला सुरुवात केली..दळण आणणे, तिला ऑफिस ला सोडून देणे, किराणा आणणे, भाज्...
गप्पागोष्टी, खाद्यभ्रमंती आणि सगळ्या मनाला भिडलेल्या गोष्टींची बखर!