Skip to main content

Posts

Showing posts from December, 2010

फ़्रेश...

आजकाल आंतरजालावर काही नवं,मनाला भिडणारं वाचायला मिळालं की पुर्वी कसं गाडीवरुन दूर दूर फ़ेरफ़टका मारुन आल्यानंतर फ़्रेश वाटायचं तसं वाटतं..वाचणे म्हणजे आपला आणि लेखकाचा संवाद..नेहमीच्या घरी होणार्या संवादापेक्षा वेगळा..वेगळा याकरता कारण ती लेखकाची एका विशिष्ट वेळेतली अभिव्यक्ती असते..लेखक अगदी त्याने लिहीलेल्या गोष्टीसारखा किंवा लेखासारखा असेल किंवा नसेल हे सांगता येत नाही.. म्हणुनच त्याच्या लिखाणाशी आपला जो संवाद होतो तो कदाचित इतका स्पेशल वाटत असावा..फ़्रेश वाटत असावा.. प्रत्येक माणसाशी बोलतांना ही इतकंच फ़्रेश वाटायला हवं नाही का? प्रत्येकाच्या स्वभावाला "अपेक्षेचं" लागलेलं ओझंच कदाचित त्याच्याशी साधलेल्या संवादाला कोमेजुन टाकत असावं..

उसासे..

ढगाळ वातावरण हातात चहाचा गरम प्याला , आणि ऐकावं "मी मज हरपून बसले गं" , दुस-या ओळीच्या शेवटी येणार्या "गं" वर एक लांब उसासा टाकावा..हा उसासा आपलं मन हरपून बसल्याच्या भावनेनं नाही तर आशाच्या कातील आवाजाने मनात उभ्या केलेल्या आपल्या नसलेल्या आणि गाणं म्हणता म्हणता तिच्या झालेल्या श्रीरंगाच्या आठवणीनं... असे कितीतरी उसासे टाकायला लावणारे आणि आपलं अस्तित्व जाणवुन पुढे जाणारे क्षण या सगळ्याच प्रतिभावान व्यक्तींनी मोठ्या ताकदीने उभे केले आहेत...मग आशाचं "तरूण आहे रात्र अजुनी" गाणं असो..किंवा गुलजारची कुठलीही कविता..प्रत्येक कलाकृती देवत्व लाभल्यासारखी...ती कलाकृती त्याला निर्माण करणार्यांनी जेवढी जगली त्याहीपेक्षा अधिक त्या कलाकृतींनी तिचा आस्वाद घेणार्यांना जगवलं...प्रत्येक ओळीगणिक , प्रत्येक स्वरागणिक त्या सगळ्याच कलाकृतींनी हृदयाचा ठाव घेतला आणि उसासा टाकायला भाग पाडलं.. असे कित्येक उसासे.. " रातराणीच्या फ़ुलांचा..गंध तू लुटलास का रे ?" म्हणतांनाचं आवाजातलं नेमकं मार्दव..आणि तेवढ्याच एका अनामिक आर्ततेनं म्हंटलेलं "सावन के कुछ मिठे मिठे पल रख्...