आज रामनवमी! प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस... या दिवशी खुप छान वाटतं मला नेहमीच. नागपुरला तशी दोन राममंदिरं आहेत. एक रामनगरला आणि एक पोद्दारेश्वर मंदिर ..दोन्हीमंदिरांची शोभायात्रा म्हणजे उत्सुकतेची बाब असते दर राम नवमीला.. लहानपणी आजी मला दर रामनवमीला राम मंदिरात घेऊन जात असे.तिथली सुंदर संगमरवराची मूर्ती लहानपणीच मला खुप आवडायची. मुळात प्रत्येक देवी देवतेच्या मूर्ती पाहुन आपल्या मनात एक विशिष्ट भाव येतात. त्यानुसार मला रामाला पाहुन शांत, प्रसन्नच वाटायचं नेहमी...अश्या वयात जेव्हा शांत प्रसन्न या दोन शब्दांची माझी पुरेशी ओळखंही नव्हती. पुढे मोठी झाल्यावर नागपूरची शोभायात्रा पहायला जाणे हा नित्याचाच कार्यक्रम असे. आई, बाबा मी आणि छकु सगळेच सोबत रामाच्या दर्शनाला जात असु. आई आपल्यासोबत फुलं, गाठी आणि गुलाल घ्यायची आणि देवाला वहायची...होळीपासुन एक गाठी रामनवमीसाठी आणि एक प्रभु रामचंद्रासाठी असं तिचं ठरलेलं असायचं. राममंदिरात कितीही गर्दी असली तरी सगळ्यांना शांतपणे दर्शन व्हायचे आणि देवाच्या प्रसन्न मूर्तीला मनात घेऊन आम्ही घरी वापस यायचो.. रामटेकला गेल्यावर माझं आणि प्रभु रामचंद्राचं न...
गप्पागोष्टी, खाद्यभ्रमंती आणि सगळ्या मनाला भिडलेल्या गोष्टींची बखर!