Pages

Tuesday, June 22, 2010

जिमस्य कथा..२

ही पोस्ट रोहन च्या या पोस्ट ला अगदी contrary आहे तेव्हा निषेध केलात तरी चालेल...पण काय आहे आजकाल अगदी नेट्वरही खाण्याचे लाखो कैलरीज ने युक्त असे पदार्थ पाहीले की वजन वाढेल अशी भिती वाटते...
पहिल्यांदा जेव्हा तळवळकरांच्या जिम ची पायरी चढले तेव्हा मला खरंच वाटलं नव्ह्तं आयुष्य इतकं बदलेल म्हणुन..जिमकडे मी फ़ार फ़ार तर अतिशय मेहनत करायची जागा याच दॄष्टीने पाहत आले होते..पण तिथे गेल्यावर माझा सगळा आऊटलुकच बदलला...हे सगळं इथे लिहीण्याचं कारण हेच की मी जे अनुभवलं ते सगळं तुम्हा सगळयांना कळावं आणि या निमित्ताने का होईना ज्या लोकांना आपण व्यायाम करायला हवा असं वाटतं ते लोक ते वाटणं सिरिअसली घेतील..
" सिडेंटरी लाईफ़स्टाईल आणि वेळी अवेळी खाणं" हे वाक्य आपण नेहमीच वर्तमानपत्रात वगैरे वाचत असतो आणि बहुदा त्याकडे कानाडोळा करत असतो..."तुमचं वयच आहे रे खायचं" हे ही वाक्य आपण नेहमीच ऐकत असतो मोठ्या माणसांकडुन..पण खरंच आपण जे खातो त्यातला प्रत्येक अंश आपल्या शरीराला आवश्यक आहे का? हा विचार आपण करत नाही, अगदी मी ही करत नव्हते...
सिडेंटरी लाईफ़स्टाईल असो किंवा धावपळ असो..व्यायामासाठी वेगळा वेळ काढणे अत्यावश्यक आहे हे आपण जरासे विसरत चाललो आहे..असं मला वाटतं..
नुकतंच आमच्या ऒफ़िसमधल्या अगदी सडपातळ बांध्याच्या मुलीला कोलेस्टेरॊल आहे असं तिने मला सांगितलं तेव्हा मला फ़ार आश्चर्य वाटलं नाही कारण आम्ही दोघेही रोज सोबत डबा खातो...तिने आणलेले तळ्कट पदार्थ त्याबरोबर भात आणि भाज्यांचं किंवा कोशिंबीरींचं कमी प्रमाण, जोडीला दर विकांताला असणारं सामिष पदार्थांचं जेवण तिच्या जास्तं असणार्या कोलेस्टेरोल ची कहाणी सांगत होतं. तर मंडळी हे सांगायचं तात्पर्य हेच की वजन आणि शरीरातल्या फ़ैट चा काही एक संबंध नाही...तुम्ही वरुन जरी अगदी सडपातळ दिसत असाल तरी ही कोलेस्टेरॊल वगैरे मंडळी आत अगदी खोलवर गेलेली असु शकते..
इथे साउथ इंडियात एक पध्दत खुप चांगली आहे..ही लोकं रात्री ७ ८ वाजताच्या सुमारास पोळ्या, इड्ली, दोसा, आपम, उपमा असा काहितरी नाश्ता करतात. त्यामुळे काय होतं की झोपेपर्यंत पाचन होऊन जातं आणि शरिरात फ़ैट जमा होण्याचे चांसेस कमी असतात.
आपल्याइकडे आपण अगदी वरण भात भाजी पोळीचं चोपून जेवण करतो आणि झोपतो मग बिचारं शरीर :( त्याला फ़ैट जमा करण्याशिवाय काही उपायच उरत नाही..तर हे सगळं टाळण्यासाठी रात्री अगदी कमीत कमी पदार्थ पोटात ढकलायचे....पण भूक तर प्रचंड लागली असते हाच प्रश्न डोक्यात असेल तुमच्या हो नं? मग त्याकरता ऒफ़िसमधुन निघतांना पोटभर ताक, नारळ पाणी, किंवा टरबूज, पपई, डाळींब इत्यादी फळांचा ज्युस प्यायचा...आपोआप भूक शमते आणि जेवणावर परीणाम होतो..
असं म्हणतात की Eat your breakfast like a king, lunch like a prince and dinner like a pauper..त्यामुळे सकाळी उठुन पोटभर नाश्ता करायचा आणि मगच बाहेर पडायचं..आता म्हणाल वेळ कुणाकडे आहे एवढा? तर ज्यांच्या दिमत्तीला आई आहे त्यांचा काहीच प्रोब्लेम नाही, जे एकटे आहेत त्यांच्या साठी ब्रेकफ़ास्ट रेडी सिरीअल्स, कोर्न फ़्लेक्स पण हो हे सगळं भरपूर खाल्लं पाहीजे...कोर्न फ़्लेक्स आणि दुधाचा डबा कुठेही खाता येतो(स्वानुभव)..ज्यांच्या सकाळच्या ट्रेन्स असतात आणि जे ऒफ़िसला ८ वाजता पोचतात त्यांनी आपल्यासोबत ब्रेड चे स्लाईसेस एखादी हेल्थी चटणी लावुन नेले तरी पुरे आहे..लंच मधे भात पोळी दोन्ही नं खाता इदर भात किंवा पोळी खायची दोन्ही सोबत खाऊ नये..असं माझी डाएटीशीअन सांगत असते..त्यामागचं कारण तिला विचारुन नक्की पोस्ट करेन..
म्हणजे अश्या तर्हेने फ़क्तं जेवणात थोडासा बदल केलात तरी अगदी लाईट वाटायला लागेल...मग पुढची स्टेप व्यायाम तो ही अगदी इच्छुकांसाठी..
अता थोडं तळवळ्कर्स बद्दल..
अतिशय छान जिम, प्रत्येकाला दिलेलं अटेंशन खुप छान...असं सारखं वाटत राहतं की यु आर टेकन केअर ऒफ़..आणि तेच खुप आहे...त्यांच्या बहुतेक सगळ्या मोठ्या शहरात शाखा आणि ड्युअल मेंबरशिप सतत फ़िरतीवर असलेल्या लोकांसाठी उत्तम आहे...
प्रत्येक जिममध्ये असलेला ज्युस बार पोटभरीचं डिपार्ट्मेंट छान संभाळतो..
इथे मद्रास मध्ये "मधुकर तळवलकर" या माणसाचं जिम ५ ते ६ ठिकाणी असणं हीच माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे..
अता राहिला प्रश्न पैशाचा..तर एकदाच्या खादाडीत आपण ३५० ते ४०० रु सहज खर्च करतो, समजा महिन्यातनं तीनदा जरी बाहेर खादाडी  झाली तरी १२०० ची वाट...मग जिमसाठी प्रत्येक महिन्यात १२०० ते १५०० रु खर्च केले तर काय वाईट आहे? हं इंस्टालमेंटची सुविधा असती तर बरं झालं असतं असं मला सतत वाटत राहतं..पण ठिके...
मग कधी करताय सुरुवात?

* As I read through the post I feel like it could have been more complete but Chalta hai..:)
* Whatever is written above is my opinion..no offense meant to anybody.

Friday, June 11, 2010

ऊर्मी..

रोज काहीतरी नवीन करण्याची ऊर्मी व्यक्त करण्याकरता तयार केलेल्या माझ्या नवीन ब्लोग ला नक्की भेट द्या..

http://doodlesofmugdha.blogspot.com/

Thursday, June 10, 2010

घर असावे...


हे नवीन डुडल जुन्या धाटणीच्या घराची कल्पना डोक्यात ठेवून चितारलेले आहे...


                   तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा..