Skip to main content

Posts

Showing posts from April, 2010

संवाद....

आज काहीतरी वेगळं लिहावं म्हणतेय.. ह्म्म! काय वेगळं ?आज सकाळचा वेळ कसा मॆनेज केला? खायला काय केलं हेच ना? नाही..वेगळं म्हणजे खुप वेगळं...एकदम फ़्रेश...मनाला खुप आनंद देणारं.. मग बाकी जे आत्ता करतेय्स ते आनंद देत नाही वाट्टं.. असं नाहिए गं..पण सगळं छान चाललं असतांना लागत असलेली चुटपूट फ़ार विचीत्र असते बघ.. तुला ना उगाच नसत्या गोष्टींबद्दल विचार करायची सवय आहे.. असंच म्हण हवं तर..पण त्या नसत्या गोष्टीच खुप महत्वाच्या आहेत असं वाटतंय मनापासुन.. चेक कर स्वतःला काहीतरी गडबड आहे नक्की.. हो आहे ना गडबड माझं मी पण समजण्याचे हेच सिम्प्टम्स आहेत कदाचित.. "मी पण" हे काय नवीन?? नवीन नाही जुनंच..पण नव्याने सुचलेलं.. काय नवीन काय जुनं? सगळं गुंडाळुन ठेवावं लागतं पोटभरीच्या भानगडीत.. खरंय गं तुझं मी पण असाच विचार करत होते..आणि बर्यापैकी जमतही होतं सगळं.. पण मग मध्येच काय ही नवी भानगड?..नव्याची जुन्याची.. अगदी घामाघुम झालं असतांना थंड हवेची झुळूक कशी वाटते..सुखदायी..तसेच वाटतायत मला माझे नवीन विचार..नवे..जगण्याला अर्थ देणारे.. आता अजुन काय अर्थ शोधायचाय? जे काही हवं होतं ते मि