Pages

Saturday, August 22, 2009

डायरी...

काल "सहजच ब्लॉग" वरील "आज मै खुशं हूं" पोस्ट वाचता वाचता अचानक लक्षात आलं की आपण बरेच दिवसांत डायरी लिहिली नाहिए..
लहानपणापासून मला वाटायचं की डायरी लिहिणारी पब्लिक खूप मोठ्ठी होत असते. म्हणजे जे सगळे पुढारी, क्रांतीकारी, लेखक वगैरे असतात ते सगळे डायरी लिहितात हा माझा मीच करून घेतलेला (गैर) समज होता.
प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला बाबांना कार्यालयाकडून डायरी मिळत असे. १० वी पास झाल्यावर मी बाबांना ही नवी कोरी डायरी मागून घेतली. त्यात नियमित लिहिणं होणार आहे का नाही, मी काय लिहिणार आहे वगैरे गोष्टींचा मला तेव्हा अजिबात पत्ता नव्हता. बस्स!! मला डायरी लिहायचीय हेच माहीत होतं.
१० वीत चांगले गुण मिळवूनही मी जरा नाराजंच होते. माझ्या अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नसल्याने मला लिहिण्यासाठी पहिला वहीला विषय मिळाला. भरभर मला काय वाटतं ते लिहिलं आणि छान हलकं वाटायला लागलं.
मुळात कुणीतरी आपलं ऐकतंय हीच कल्पना किती छान आहे. मला खूप सांगायचं असायचं त्या दिवसात पण कुणाला सांगू? हा कायम प्रश्न असायचा माझ्यासमोर. आई, बाबा, छकु होतेच, पण आई एक वेगळीच मैत्रीण होती. वेळोवेळी चुकलं की सावध करणारी आणि मोठेपणी मुलींनी कसं वागावं कसं राहावं हे सांगणारी. बाबा माझे बेस्ट फ़्रेंड..मस्तं मजा करायची मी त्यांच्यासोबत. माझ्या परीक्षांच्या वेळी मला सकाळी उठवणे, मला झोप येऊ नये म्हणून माझ्यासोबत जागणे हे ते अगदी प्रेमाने करत असत. कुठलाही चित्रपट बघताना त्यांच्यासारखी कंपनी मला कधीच मिळाली नाही. माझी बहीण माझ्यापेक्षा वयाने लहान होती. मला बऱ्याच गोष्टी शेअर करता यायच्या तिच्याशी.
हे तिघे एवढे मोकळे आणि छान असताना खरंतर मला अजून कुणाची आवश्यकताच नव्हती मन मोकळं करण्यासाठी . पण तरीही आपल्या मनातला एक कोपरा असा असतो म्हणतात की त्यातल्या गोष्टी कुणालाही सांगण्यासारख्या नसतात. तसंच काहीसं होतं त्यावेळी. अश्याच जपून ठेवलेल्या अनेक गोष्टीचा घडा मी डायरी जवळ वेळॊवेळी रिता केला.
११ वीत मला जे महाविद्यालय मिळालं ते ख्रिस्ती मिशनरीज चं होतं. तिथे सगळ्या मुली स्कर्ट्स, फ्रॉक, जीन्स वगैरे घालून यायच्या. इंग्रजी बोलायच्या. मी त्यातल्या त्यात काकूबाई असल्याने तेव्हा मला हे सगळं नवीनच होतं. नवीन लोक, नवीन जागा, नवीन तऱ्हा.. बापरे! :( मी तर बावरूनच गेले होते. बाबांना पहिला दिवस छान गेला म्हणूनच सांगितले पण नंतर मात्र डायरीत मी सगळं लिहिलं मोकळेपणाने...हळूहळू दिवस जात होते. माझ्या सारख्या २ मैत्रिणी मिळाल्या आणि सगळं सोपा व्हायला लागलं.. :)
त्या दिवसानंतर मी हक्काने प्रत्येक गोष्ट डायरीला सांगू लागली..
अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षी आईपासून दूर राहताना डायरीच होती सोबतीला. मी खूपच रोंदु होते तेव्हा (असं आता वाटतंय मला :) ) जे जे काही खटकलं ते ते पहिल्या वर्षी डायरीत लिहिलं....माझे पहिले वहीले बैक लोग्स, मला आवडणारी गाणी, नावडणारे प्रोफ़ेसर्स, आवडणारे प्रोफ़ेसर्स..क्लासमधल्या गमती जमती, हॉस्टेल मधल्या, रूम मधल्या गमती जमती, रिझल्टचा धिंगाणा सगळं सगळं लिहायचे मी अगदी आवडीने नं विसरता. माझी सही नव्या प्रकारे करण्याची हुक्की ही मला तेव्हाच आली..
नव्या जागेतला नवा पाऊस मनाला चाळवल्याशिवाय कसा राहील? मग सुरू झाल्या कविता...आणि मुळात काहीतरी हक्काचं असं लिहायला असलं ना तर हे असले सगळे प्रयोग करण्याला मजा येते. हळूहळू डायरी लिहिताना स्केचपेन्स वापरून एक एक पान सुंदर बनवायचा प्रयत्न होऊ लागला.
कुठेतरी या माध्यमातून आपण जाणाऱ्या क्षणांना सोबतच ठेवतोय ही जाणीव व्हायला लागली....
अभियांत्रिकीचं शेवटचं वर्ष खूप मजेदार असतं. ट्रेडिशनल डे, रोज डॆ, फ़ोर्मल डे सगळं सगळं साजरं करून आल्यावर झालेल्या घडामोडी मी डायरीत नमूद करू लागली. सोबत असायचं एकच समाधान की माझं डायरी रूपाने कुणीतरी सहप्रवासी आहे.
प्रत्येक वर्षी माझ्या बाबांनी,मैत्रिणींनी, मित्रांनी, भावांनी मला डायरी आणून देण्याची, किंवा गिफ्ट करायची मोलाची कामगिरी बजावली आहे. आपल्या पुढ्यातील सुंदर डायरी दुसऱ्या कुणाला गिफ्ट करायचं धैर्य मला अजूनही प्राप्त झालेलं नाही. ह्या सगळ्यांनी मात्र माझे हे लाड अगदी मनापासून पुरवले आहेत यात काही वाद नाही.
पुढे पुण्यात आल्यावरही माझं डायरी लेखन अविरत सुरू होतं...हक्काचा सखा मिळाल्यावरही मला वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी मी लिहीत गेले. त्यामुळे माझे डायरीशी असणारे बंधही बळकट झाले होते.
पुढे घडत गेलेल्या वाईट प्रसंगांची माझ्या मनातली नोंदच इतकी घावासारखी होती की डायरीत ते सगळं लिहून मला अजून वाईट वाटवून घ्यायचं नव्हतं कदाचित..म्हणूनच एका काळानंतर मी अनियमितपणे पण...लिहीत गेले. आयुष्य बरंच काही शिकवून गेलं ३ वर्षांच्या काळात...डायरी होतीच माझी सहप्रवासी म्हणून पण मीच नाही जास्त तसदी दिली तिला.
काही गोष्टी नं लिहिलेल्याच बऱ्या असतात मुग्धा असं आई नेहमी म्हणायची..ती गेल्यावर मला हे पुरतं जाणवलं. तरीही अधून मधून "आज बरेच दिवसांनी लिहितेय" या मजकुरासकट डायरी लिहिणं जे सुरू होई ते अर्ध्या पानातच संपत असे...
माझा सखा माझ्या आयुष्यात जोडीदार म्हणून आला ते सोनेरी क्षण मात्र मी माझ्या डायरीत जपून ठेवले आहेत...डायरी ही एक साक्षीदार होती त्याच्या आणि माझ्या प्रेमाची, एखाद्या चोरट्या कटाक्षाची, निखळ प्रेमळ गप्पांची..
काल मला डायरीची कळवळून आठवण आली..बरेच क्षण आपण जपून ठेवलेच नाही असं मला प्रामाणिकपणे वाटलं..म्हणूनच आज पुन्हा जुनीच डायरी उघडणार आहे....त्यात नियमित पणे लिहिणं होणार आहे का नाही, मी काय लिहिणार आहे वगैरे गोष्टींचा मला अजूनही अजिबात पत्ता नाही बस्स!! डायरी लिहायचीय हेच पक्कं माहीत आहे...
काल "सहजच ब्लॉग" वरील "आज मै खुशं हूं" पोस्ट वाचता वाचता अचानक लक्षात आलं की आपण बरेच दिवसांत डायरी लिहिली नाहिए...

लहानपणापासून मला वाटायचं की डायरी लिहिणारी पब्लिक खूप मोठ्ठी होत असते. म्हणजे जे सगळे पुढारी, क्रांतीकारी, लेखक वगैरे असतात ते सगळे डायरी लिहितात हा माझा मीच करून घेतलेला (गैर) समज होता.

प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला बाबांना कार्यालयाकडून डायरी मिळत असे. १० वी पास झाल्यावर मी बाबांना ही नवी कोरी डायरी मागून घेतली. त्यात नियमित लिहिणं होणार आहे का नाही, मी काय लिहिणार आहे वगैरे गोष्टींचा मला तेव्हा अजिबात पत्ता नव्हता. बस्स!! मला डायरी लिहायचीय हेच माहीत होतं.

१० वीत चांगले गुण मिळवूनही मी जरा नाराजंच होते. माझ्या अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नसल्याने मला लिहिण्यासाठी पहिला वहीला विषय मिळाला. भरभर मला काय वाटतं ते लिहिलं आणि छान हलकं वाटायला लागलं.

मुळात कुणीतरी आपलं ऐकतंय हीच कल्पना किती छान आहे. मला खूप सांगायचं असायचं त्या दिवसात पण कुणाला सांगू? हा कायम प्रश्न असायचा माझ्यासमोर. आई, बाबा, छकु होतेच, पण आई एक वेगळीच मैत्रीण होती. वेळोवेळी चुकलं की सावध करणारी आणि मोठेपणी मुलींनी कसं वागावं कसं राहावं हे सांगणारी. बाबा माझे बेस्ट फ़्रेंड..मस्तं मजा करायची मी त्यांच्यासोबत. माझ्या परीक्षांच्या वेळी मला सकाळी उठवणे, मला झोप येऊ नये म्हणून माझ्यासोबत जागणे हे ते अगदी प्रेमाने करत असत. कुठलाही चित्रपट बघताना त्यांच्यासारखी कंपनी मला कधीच मिळाली नाही. माझी बहीण माझ्यापेक्षा वयाने लहान होती. मला बऱ्याच गोष्टी शेअर करता यायच्या तिच्याशी.

हे तिघे एवढे मोकळे आणि छान असताना खरंतर मला अजून कुणाची आवश्यकताच नव्हती मन मोकळं करण्यासाठी . पण तरीही आपल्या मनातला एक कोपरा असा असतो म्हणतात की त्यातल्या गोष्टी कुणालाही सांगण्यासारख्या नसतात. तसंच काहीसं होतं त्यावेळी. अश्याच जपून ठेवलेल्या अनेक गोष्टीचा घडा मी डायरी जवळ वेळॊवेळी रिता केला.

११ वीत मला जे महाविद्यालय मिळालं ते ख्रिस्ती मिशनरीज चं होतं. तिथे सगळ्या मुली स्कर्ट्स, फ्रॉक, जीन्स वगैरे घालून यायच्या. इंग्रजी बोलायच्या. मी त्यातल्या त्यात काकूबाई असल्याने तेव्हा मला हे सगळं नवीनच होतं. नवीन लोक, नवीन जागा, नवीन तऱ्हा.. बापरे! :( मी तर बावरूनच गेले होते. बाबांना पहिला दिवस छान गेला म्हणूनच सांगितले पण नंतर मात्र डायरीत मी सगळं लिहिलं मोकळेपणाने...हळूहळू दिवस जात होते. माझ्या सारख्या २ मैत्रिणी मिळाल्या आणि सगळं सोपा व्हायला लागलं.. :)

त्या दिवसानंतर मी हक्काने प्रत्येक गोष्ट डायरीला सांगू लागली..

अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षी आईपासून दूर राहताना डायरीच होती सोबतीला. मी खूपच रोंदु होते तेव्हा (असं आता वाटतंय मला :) ) जे जे काही खटकलं ते ते पहिल्या वर्षी डायरीत लिहिलं....माझे पहिले वहीले बैक लोग्स, मला आवडणारी गाणी, नावडणारे प्रोफ़ेसर्स, आवडणारे प्रोफ़ेसर्स..क्लासमधल्या गमती जमती, हॉस्टेल मधल्या, रूम मधल्या गमती जमती, रिझल्टचा धिंगाणा सगळं सगळं लिहायचे मी अगदी आवडीने नं विसरता. माझी सही नव्या प्रकारे करण्याची हुक्की ही मला तेव्हाच आली..

नव्या जागेतला नवा पाऊस मनाला चाळवल्याशिवाय कसा राहील? मग सुरू झाल्या कविता...आणि मुळात काहीतरी हक्काचं असं लिहायला असलं ना तर हे असले सगळे प्रयोग करण्याला मजा येते. हळूहळू डायरी लिहिताना स्केचपेन्स वापरून एक एक पान सुंदर बनवायचा प्रयत्न होऊ लागला.

कुठेतरी या माध्यमातून आपण जाणाऱ्या क्षणांना सोबतच ठेवतोय ही जाणीव व्हायला लागली....

अभियांत्रिकीचं शेवटचं वर्ष खूप मजेदार असतं. Traditional Day, Rose Day, Formal Day सगळं सगळं साजरं करून आल्यावर झालेल्या घडामोडी मी डायरीत नमूद करू लागली. सोबत असायचं एकच समाधान की माझं डायरी रूपाने कुणीतरी सहप्रवासी आहे.

प्रत्येक वर्षी माझ्या बाबांनी,मैत्रिणींनी, मित्रांनी, भावांनी मला डायरी आणून देण्याची, किंवा गिफ्ट करायची मोलाची कामगिरी बजावली आहे. आपल्या पुढ्यातील सुंदर डायरी दुसऱ्या कुणाला गिफ्ट करायचं धैर्य मला अजूनही प्राप्त झालेलं नाही. ह्या सगळ्यांनी मात्र माझे हे लाड अगदी मनापासून पुरवले आहेत यात काही वाद नाही.

पुढे पुण्यात आल्यावरही माझं डायरी लेखन अविरत सुरू होतं...हक्काचा सखा मिळाल्यावरही मला वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी मी लिहीत गेले. त्यामुळे माझे डायरीशी असणारे बंधही बळकट झाले होते.

पुढे घडत गेलेल्या वाईट प्रसंगांची माझ्या मनातली नोंदच इतकी घावासारखी होती की डायरीत ते सगळं लिहून मला अजून वाईट वाटवून घ्यायचं नव्हतं कदाचित..म्हणूनच एका काळानंतर मी अनियमितपणे पण...लिहीत गेले. आयुष्य बरंच काही शिकवून गेलं ३ वर्षांच्या काळात...डायरी होतीच माझी सहप्रवासी म्हणून पण मीच नाही जास्त तसदी दिली तिला.

काही गोष्टी नं लिहिलेल्याच बऱ्या असतात मुग्धा असं आई नेहमी म्हणायची..ती गेल्यावर मला हे पुरतं जाणवलं. तरीही अधून मधून "आज बरेच दिवसांनी लिहितेय" या मजकुरासकट डायरी लिहिणं जे सुरू होई ते अर्ध्या पानातच संपत असे...

माझा सखा माझ्या आयुष्यात जोडीदार म्हणून आला ते सोनेरी क्षण मात्र मी माझ्या डायरीत जपून ठेवले आहेत...डायरी ही एक साक्षीदार होती त्याच्या आणि माझ्या प्रेमाची, एखाद्या चोरट्या कटाक्षाची, निखळ प्रेमळ गप्पांची..

काल मला डायरीची कळवळून आठवण आली..बरेच क्षण आपण जपून ठेवलेच नाही असं मला प्रामाणिकपणे वाटलं..म्हणूनच आज पुन्हा जुनीच डायरी उघडणार आहे....त्यात नियमित पणे लिहिणं होणार आहे का नाही, मी काय लिहिणार आहे वगैरे गोष्टींचा मला अजूनही अजिबात पत्ता नाही... बस्स!! डायरी लिहायचीय हेच पक्कं माहीत आहे...

Tuesday, August 18, 2009

चीड आणणारे काही..

चीड आणणारे काही..
जोरजोरात बोलणे विशेषतः फ़ोनवर.
मोबाईल च्या जोरजोरात वाजणार्या कर्कश्श रिंगटोन्स
काही बोलत असतांना, महत्वाचे घरगुती काम करत असतांना टि.व्ही चा आवाज, मोबाईलचा आवाज.
खुप जोरात चालणारा पंखा, कुलर, ए.सी आणि त्यांचे आवाज
स्वयंपाकघराच्या ओट्यावरची अस्वच्छता.
फ़ालतुचं होंकिंग
घरात असलेली पाल (प्रत्यक्षात मला काहिही करत नसली तरी ),मुंग्या,किडे
रात्री झोपतांना सुरु असलेला लाईट आणि त्याने होणारी गरमी
फ़ुरके मारुन चहा पिणे.
जेवण झाल्यावर सगळ्यांसमोर जोरदार ढेकर देणे(घरी किंवा पंक्तीत बसले असल्यास ठीक आहे, पण ओफ़िसमध्ये???)
नको तिथे फ़िलोसोफ़ि झाडणे.
आपणंच किती दुःखी आहोत हे वारंवार सांगणारे लोकं..
तार सप्तकात म्हंटलेली गाणी विशेषकरुन तमिळ गाणी ज्यात नको तिथे तार सप्तक वापरले आहे.
आजकालचे रेडिओ मिरची आणि बरेचसे एफ़.एम चैनेल्स आणि त्यावरच्या तथाकथित आर. जे ची वायफ़ळ बडबड.
हमाम ची जाहिरात...
तमाम सास बहू सिरियल्स.
गर्दी...विशेषत: देवळातली.
फ़ोनवर बोलतांना खुप पाल्हाळ लावणारी माणसं.
"मी महान" चा नारा असलेली माणसं
फ़ोर्वर्ड इमेल्स आणि मेसेजेस..
अरेव्वा! बरीच लांब झालीए लिस्ट. आमच्या कंपनीत एकदा प्रश्न विचारला होता की "तुम्हाला कुठल्या गोष्टीची प्रचंड चीड आहे?" तेव्हा मला काहीच सुचलं नाही. वरचे सगळे पोइन्ट्स लिहिले असते तर पैकी च्या पैकी मार्क्स मिळाले असते नाही? आणणारे काही..जोरजोरात बोलणे विशेषतः फ़ोन आणणारे काही..
 1. जोरजोरात बोलणे विशेषतः फ़ोनवर.
 2. मोबाईल च्या जोरजोरात वाजणार्‍या रिंग टोन्स
 3. काही बोलत असतांना, महत्वाचे घरगुती काम करत असतांना जोरात सुरु असलेला टी.व्ही , मोबाईलचा आवाज.
 4. खुप जोरात चालणारा पंखा, कुलर, ए.सी आणि त्यांचे आवाज
 5. स्वयंपाकघराच्या ओट्यावरची अस्वच्छता.
 6. फ़ालतुचं Honking
 7. घरात असलेली पाल (प्रत्यक्षात मला काहिही करत नसली तरी ),मुंग्या,किडे
 8. झोपतांना सुरु असलेला लाईट आणि त्याने होणारी गरमी
 9. फ़ुरके मारुन चहा पिणे.
 10. जेवण झाल्यावर सगळ्यांसमोर जोरदार ढेकर देणे (घरी किंवा पंक्तीत बसले असल्यास ठीक आहे, पण ऑफिस मध्ये??)
 11. नको तिथे फिलोसोफी झाडणे.
 12. आपणंच किती दुःखी आहोत हे वारंवार सांगणारे लोकं..
 13. तार सप्तकात म्हंटलेली गाणी विशेषकरुन तमिळ गाणी ज्यात नको तिथे तार सप्तक वापरले आहे.
 14. आजकालचे रेडिओ मिरची आणि बरेचसे एफ़.एम आणि त्यावरच्या तथाकथित आर. जे ची वायफ़ळ बडबड.
 15. हमाम ची जाहिरात...
 16. तमाम सास बहू सिरियल्स.
 17. गर्दी...विशेषत: देवळातली.
 18. फ़ोनवर बोलतांना खुप पाल्हाळ लावणारी माणसं.
 19. "मी महान" चा नारा असलेली माणसं
 20. फॉरवर्ड इमेल्स आणि मेसेजेस..
अरेव्वा! बरीच लांब झालीए लिस्ट. आमच्या कंपनीत एकदा प्रश्न विचारला होता की "तुम्हाला कुठल्या गोष्टीची प्रचंड चीड आहे?" तेव्हा मला काहीच सुचलं नाही. वरचे सगळे पॉइंट्स लिहिले असते तर पैकी च्या पैकी मार्क्स मिळाले असते नाही?
बरेच दिवसांपासून वर लिहिलेल्या सगळ्याच गोष्टींचा मला संताप येतो..काहीही केलं तरी दुर्लक्ष कस्सं म्हणुन करता येत नाही ..म्हणुन म्हंटलं लिहुन पहावं ब्लॉग वर थोडा तरी आराम होईल ;)

Friday, August 14, 2009

जिमस्य कथा!!

जिमस्य कथा!!
आज शुक्रवार, जिम ला रुजु होऊन हाश्श हुश्श!! करत आठ दिवस पूर्ण झाले. डाएट अगदी जोमात सुरु आहे. दिवसातुन ७ वेळा पोटोबा करण्याला कुठ्लं डाएट म्हणतात कुणास ठाऊक? पण मी मात्र मजेत आहे. व्यायामामुळे जरी अजुन खुप वजन कमी झालं नाही तरी भाताच्या जंजाळातुन कायमची सुटका झाल्याचा आनंद काय वर्णावा.
भात नं खाल्ल्यास मला वाईट वगैरे वाटेल असं वाटुन माझ्या डाएटीशिअन नी एक वेळा भात खायची परवानगी दिलीए..तिला मात्र मी ठासुन सांगितलं की कृपा करुन मला भात खायला सांगु नकोस..हे ऐकुन तिच्या चेहर्यावरचे आश्चर्याचे भाव मला जणुकाही एकदम "तुम्ही कसं काय भात नं खाता राहु शकता?" हा प्रश्न विचारुन गेले.
खरं सांगायचं झालं तर मी लहानपणापासुनच लठठ आहे. ओबेसिटी, बि.एम. आय वगैरे मोजमाप उपलब्ध नसण्याचा तो सुखद काळ. तेव्हा फ़ार फ़ार तर लोक मी ८ वीत असतांना "दहावीत आहे का हो तुमची मुलगी?" असं विचारायचे आईला. आईही जास्तं माईंड करायची नाही असले कमेंट्स. तिने मला कधीही तु लठ्ठ आहेस असं म्हंटलेलं आठवत नाही...ती फ़क्त "तु हेल्थी आहेस" असं म्हणायची. माझं वजन मात्र नेहमीच थोडं जास्तं असावं तेव्हाही.
लहानपणी आई रसगुल्ले आणुन ठेवायची फ़्रिज मध्ये, दुसरे दिवशी सकाळी शाळेत जातांना एक रसगुल्ला द्यायची..पुढे मागे एखादं सुकलेलं अंजीर, कधी बर्फ़ी, कधी आदल्या दिवशीचा पेढ्याचा प्रसाद, चतुर्थीच्या दुसर्या दिवशी राहिलेले मोदक असा माझा नाश्ता व्हायचा. डब्ब्यात मात्र भाजी पोळी. घरी आल्यावर "आई काहितरी कर नं" असं म्हंटल्यावर पुढे येणारे डीप फ़्राईड तांदळाचे पापड, कांदा भजी, पोहे, शिरा आणि काही नाही केलं तर बाहेरचे ढोकळे किंवा समोसे मिरची के साथ...असा मस्तं पैकी snacks चा कार्यक्रम व्हायचा, आणि मग रात्री गरम गरम पोळ्या भाजी, फ़ोडणीचं चिंच गुळ टाकुन केलेलं वरण आणि भात वरुन तुप..(गेले ते दिन गेले :( ) आता नुसतं गोड पाहिलं तरीही वजन वाढेल असं मला वाटायला लागलं आहे.
आता सकाळच्या रसगुल्ल्याचं स्थान ग्लासभर कोमट पाण्याने घेतलंय, चहा मात्र आपलं स्थान कायम टिकवुन आहे..पारले जी च्या बिस्कीटांना ढकलुन मारी किंवा मोनॅको बिस्कीटे स्थानारुढ झालेत.
ओट्स सारखा भयाण पदार्थ त्रिभुवनात नाही याबाबतीत तरी कुणाचेच दुमत नसावे. आता तो दुधात साखर नं घालता घ्यायचा असल्यास आजारी पडायचीच वेळ येईल असं वाटत होतं मला, लगेचच ताक माझ्या मदतीला धावून आल्याने माझी वर वर्णिलेल्या त्या भयंकर प्रसंगातुन सुटका झाली. (ताकासोबत ओट्स जरा बरे वाटतात.)
मला दिलेल्या डाएट मध्ये फ़ळांना भरपुर स्थान दिलंय. अगदी दिवसातुन ४ सर्विंग्स तरी पोटात ढकलायचेच असं सांगितलंय. त्यामुळे आमची स्वारी खुष, फ़क्त फ़ळं धुवुन, चिरुन खाण्यापर्यंत पेशन्स नी साथ दिली म्हणजे कमावली..:)
मी कधी फ़ळं अगदी स्वच्छ धुवुन, काप करुन खाल्ल्याचं आठवत नाही. आजीकडे डाळींब, पेरु, सीताफ़ळं,पपई यांची झाडंच होती. पेरु,पपई तर मी झाडावर चढुन तोडुनच खाल्ले आहेत लहानपणी. डाळींब, सीताफ़ळं ही घरचेच खाल्ले आहेत. मामा नाशिकला असल्याने द्राक्षांच्या मोसमात तो पेटीच पाठवायचा त्यामुळे पेटी संपेपर्यंत ईतर झाडांना माझा कमी त्रास व्हायचा. बोरं, करवंद, ऊस यांची आजीकडे रेलचेल असायची. आताशा प्लास्टीकच्या पिशवीत ऊसाची पेरं बंद पाहुन मला त्या ऊसाबद्दलच वाईट वाटतं, लहानपणी ऊस खायचा एक वेगळा कार्यक्रमच व्हायचा तुळशीच्या लग्नानंतर. ऊस खाऊन खाऊन तोंड सोलेपर्यंत मन भरत नसे. आंबे तर विचारायलाच नको.आबांच्या ओळखीच्या कुणाकडुन तरी खास त्यांच्या बागेतले आंबे यायचे घरी मग काय? आंब्याचा रस, आंब्याच्या पोळ्या, आंबा चोखुन खाणे...मजाच मजा. संत्र्याचा मोसम आला की बाबा डझनानी संत्री आणायचे. तेवढे दिवस आम्ही दुसर्या कुठल्याही फ़ळाला ढुंकुनही पाहत नसु.नागपुरचं चिखलाने भरलेलं संत्रा मार्केट, तिथलं बाबांच ठरलेलं दुकान, आणि तिथला मनमोकळेपणा. आता त्या पळमुदिर शोलई (इथलं फ़ळांचं दुकान) मध्ये जाऊन फ़ळं घेतांना उगाच अवघडल्यासारखं होतं.
फ़ळं आणुन त्याचे नीट काप करुन खाण्याची मजाही काही और असते हे ही तेवढंच खरंय. आम्ही होस्टेल मधे असतांना माझी एक मैत्रीण इतकी सफ़ाईने फ़ळं कापायची की मी तिच्याच मुळे फ़ळं नीट कापुन खायला शिकले..नाही तर "दिसलं फ़ळ की खा" हा माझा फ़ंडा होता. ;)
लग्नाआधी केलेल्या डाएटिंग मधे दही खायला मनाई होती. पण यावेळी नाही. त्यामुळे मी मनसोक्त फ़ेटलेलं दही खाऊ शकते. डाळींबाच्या लाल चुटुक दाण्यांसोबत मस्तं फ़ेटलेलं घट्टं दही खाणे म्हणजे स्वर्ग आहे (हे तुम्हालाही खाल्ल्यावरच कळेल ही आपली गैरेंटी).
दिवसभरातुन फ़क्त २ चमचेच तेल खायचे असल्याने कमीत कमी तेलात भाजी करणे रिसेंट आव्हान त्यातच शिमला मिरची चे काप १/२ चमचा ओलिव तेलात फ़्राय केल्यास भाजीला मस्तं स्वाद येतो ही मी काल केलेली डीस्कवरी ;)
फ़ोडणीच्या वरणातुन गुळ आणि चिंच जाऊन आता साधी दालफ़्राय खावी लागतेय...खाता येते हे ही नसे थोडके. भरपूर कडधान्ये, काकडी, टमाटर या सगळ्या मंडळींनी माझ्या ताटात डॅशिंग एन्ट्री मारली आहे. रोज कोशिंबिर खाऊन तर असं समाधान मिळतं म्हणुन सांगु? यासगळ्या सोबत जिममधे घाम गाळण्याचा आनंदच काही निराळा.
मुळात आठवडा भरापासुन मला हलकं वाटतंय. माझा स्टॅमिना जरा वाढलाय असं मला नवरा म्हणाला. मी घरातली कामं आणि ऑफ़िसातली कामं जास्तं उत्साहाने करु शकते.नाहितर घर सांभाळुन सगळं करणं माझ्या अवाक्याबाहेरचं काम होतं.
सगळ्या गृहिणींनी या चातुर्मासाच्या निमित्ताने आपापलं आरोग्य सुधारण्याचा संकल्प करावा असं मला या एका आठवड्यात प्रकर्षाने जाणवलं. चातुर्मास म्हणजे उपासांची भरमार, एक संपला की दुसरा, प्रत्येक आठवडा उत्सवाच्या दृष्टीने एकदम हॅपनिंग, लागोपाठ सणं त्यासाठी करावे लागणारे नैवेद्य, नैवेद्य तयार होईस्तोवर केलेला उपास..हे सगळं कितीतरी स्ट्रेसफ़ुल असतं. नुसती फ़ळं खाऊन किंवा दुध पिऊन दिवसभरात होणार्या श्रमांचा परिहार होणे शक्यच नसतं. मग तब्येतीच्या लहानसहान कुरबुरी सुरु होतात. प्रत्येक घरातील स्वयंपाकघराची काळजी त्या त्या घरातली आईच करु जाणे. ती जशी सगळ्यांची काळजी घेते तशीच घरातल्या प्रत्येकाने तिची काळजी घेऊन दिवसातुन तिला १ तास तिच्या तब्येतीसाठी काढायला लावणे हे अतिशय आवश्यक आहे. उपदेश जरा जास्तंच झाला नाही??? ;)
सध्यातरी माझं वजन फ़ारसं कमी झालेलं नाही. जेव्हा कमी होईल तेव्हा भेटुया.. बिफ़ोर आणि आफ़्टर च्या फ़ोटो सकट..एका नविन पोस्ट मध्ये..तोवर विश मी हॅपी जिमिंग..:)
आज शुक्रवार, जिम ला रुजु होऊन हाश्श हुश्श!! करत आठ दिवस पूर्ण झाले. डाएट अगदी जोमात सुरु आहे. दिवसातुन ७ वेळा पोटोबा करण्याला कुठ्लं डाएट म्हणतात कुणास ठाऊक? पण मी मात्र मजेत आहे. व्यायामामुळे जरी अजुन खुप वजन कमी झालं नाही तरी भाताच्या जंजाळातुन कायमची सुटका झाल्याचा आनंद काय वर्णावा?

भात नं खाल्ल्यास मला वाईट वगैरे वाटेल असं वाटुन माझ्या डाएटीशिअन नी एक वेळा भात खायची परवानगी दिलीए.तिला मात्र मी ठासुन सांगितलं की कृपा करुन मला भात खायला सांगु नकोस.हे ऐकुन तिच्या चेहर्‍यावरचे आश्चर्याचे भाव मला जणुकाही एकदम "तुम्ही कसं काय भात नं खाता राहु शकता?" हा प्रश्न विचारुन गेले.

खरं सांगायचं झालं तर मी लहानपणापासुनच लठ्ठ आहे. ओबेसिटी, बि.एम. आय वगैरे मोजमाप उपलब्ध नसण्याचा तो सुखद काळ. तेव्हा फ़ार फ़ार तर लोक मी ८ वीत असतांना "दहावीत आहे का हो तुमची मुलगी?" असं विचारायचे आईला. आईही जास्तं माईंड करायची नाही असले कमेंट्स. तिने मला कधीही तु लठ्ठ आहेस असं म्हंटलेलं आठवत नाही...ती फ़क्त "तु healthy आहेस" असं म्हणायची. माझं वजन मात्र नेहमीच थोडं जास्तं असावं तेव्हाही.

लहानपणी आई रसगुल्ले आणुन ठेवायची फ़्रिज मध्ये, दुसरे दिवशी सकाळी शाळेत जातांना एक रसगुल्ला द्यायची.पुढे मागे एखादं सुकलेलं अंजीर, कधी बर्फ़ी, कधी आदल्या दिवशीचा पेढ्याचा प्रसाद, चतुर्थीच्या दुसर्‍या दिवशी राहिलेले मोदक असा माझा नाश्ता व्हायचा. डब्ब्यात मात्र भाजी पोळी. घरी आल्यावर "आई काहितरी कर नं" असं म्हंटल्यावर पुढे येणारे डीप फ़्राईड तांदळाचे पापड, कांदा भजी, पोहे, शिरा आणि काही नाही केलं तर बाहेरचे ढोकळे किंवा समोसे मिरची के साथ.असा मस्तं पैकी snacks चा कार्यक्रम व्हायचा, आणि मग रात्री गरम गरम पोळ्या भाजी, फ़ोडणीचं चिंच गुळ टाकुन केलेलं वरण आणि भात वरुन तुप..(गेले ते दिन गेले :( ) आता नुसतं गोड पाहिलं तरीही वजन वाढेल असं मला वाटायला लागलं आहे.

आता सकाळच्या रसगुल्ल्याचं स्थान ग्लासभर कोमट पाण्याने घेतलंय, चहा मात्र आपलं स्थान कायम टिकवुन आहे..पारले जी च्या बिस्कीटांना ढकलुन मारी किंवा मोनॅको बिस्कीटे स्थानारुढ झालेत. ओट्स सारखा भयाण पदार्थ त्रिभुवनात नाही याबाबतीत तरी कुणाचेच दुमत नसावे. आता तो दुधात साखर नं घालता घ्यायचा असल्यास आजारी पडायचीच वेळ येईल असं वाटत होतं मला, लगेचच ताक माझ्या मदतीला धावून आल्याने माझी वर वर्णिलेल्या त्या भयंकर प्रसंगातुन सुटका झाली. (ताकासोबत ओट्स जरा बरे वाटतात.)

मला दिलेल्या डाएट मध्ये फ़ळांना भरपुर स्थान दिलंय. अगदी दिवसातुन ४ सर्विंग्स तरी पोटात ढकलायचेच असं सांगितलंय. त्यामुळे आमची स्वारी खुष, फ़क्त फ़ळं धुवुन, चिरुन खाण्यापर्यंत पेशन्स नी साथ दिली म्हणजे कमावली..:)

मी कधी फ़ळं अगदी स्वच्छ धुवुन, काप करुन खाल्ल्याचं आठवत नाही. आजीकडे डाळींब, पेरु, सीताफ़ळं,पपई यांची झाडंच होती. पेरु,पपई तर मी झाडावर चढुन तोडुनच खाल्ले आहेत लहानपणी. डाळींब, सीताफ़ळं ही घरचेच खाल्ले आहेत. मामा नाशिकला असल्याने द्राक्षांच्या मोसमात तो पेटीच पाठवायचा त्यामुळे पेटी संपेपर्यंत ईतर झाडांना माझा कमी त्रास व्हायचा. बोरं, करवंद, ऊस यांची आजीकडे रेलचेल असायची.

आताशा प्लास्टीकच्या पिशवीत ऊसाची पेरं बंद पाहुन मला त्या ऊसाबद्दलच वाईट वाटतं, लहानपणी ऊस खायचा एक वेगळा कार्यक्रमच व्हायचा तुळशीच्या लग्नानंतर. ऊस खाऊन खाऊन तोंड सोलेपर्यंत मन भरत नसे. आंबे तर विचारायलाच नको.आबांच्या ओळखीच्या कुणाकडुन तरी खास त्यांच्या बागेतले आंबे यायचे घरी मग काय? आंब्याचा रस, आंब्याच्या पोळ्या, आंबा चोखुन खाणे.मजाच मजा. संत्र्याचा मोसम आला की बाबा डझनानी संत्री आणायचे. तेवढे दिवस आम्ही दुसर्‍या कुठल्याही फ़ळाला ढुंकुनही पाहत नसु.नागपुरचं चिखलाने भरलेलं संत्रा मार्केट, तिथलं बाबांच ठरलेलं दुकान, आणि तिथला मनमोकळेपणा. आता त्या पळमुदिर शोलई (इथलं फ़ळांचं दुकान) मध्ये जाऊन फ़ळं घेतांना उगाच अवघडल्यासारखं होतं.

फ़ळं आणुन त्याचे नीट काप करुन खाण्याची मजाही काही और असते हे ही तेवढंच खरंय. आम्ही होस्टेल मधे असतांना माझी एक मैत्रीण इतकी सफ़ाईने फ़ळं कापायची की मी तिच्याच मुळे फ़ळं नीट कापुन खायला शिकले.नाही तर "दिसलं फ़ळ की खा" हा माझा फ़ंडा होता. ;)

लग्नाआधी केलेल्या डाएटिंग मधे दही खायला मनाई होती. पण यावेळी नाही. त्यामुळे मी मनसोक्त फ़ेटलेलं दही खाऊ शकते. डाळींबाच्या लाल चुटुक दाण्यांसोबत मस्तं फ़ेटलेलं घट्टं दही खाणे म्हणजे स्वर्ग आहे (हे तुम्हालाही खाल्ल्यावरच कळेल ही आपली गैरेंटी).

दिवसभरातुन फ़क्त २ चमचेच तेल खायचे असल्याने कमीत कमी तेलात भाजी करणे रिसेंट आव्हान त्यातच शिमला मिरची चे काप १/२ चमचा ओलिव तेलात फ़्राय केल्यास भाजीला मस्तं स्वाद येतो ही मी काल केलेली डीस्कवरी ;)

फ़ोडणीच्या वरणातुन गुळ आणि चिंच जाऊन आता साधी दालफ़्राय खावी लागतेय.खाता येते हे ही नसे थोडके. भरपूर कडधान्ये, काकडी, टमाटर या सगळ्या मंडळींनी माझ्या ताटात डॅशिंग एन्ट्री मारली आहे. रोज कोशिंबिर खाऊन तर असं समाधान मिळतं म्हणुन सांगु? यासगळ्या सोबत जिममधे घाम गाळण्याचा आनंदच काही निराळा.

मुळात आठवडा भरापासुन मला हलकं वाटतंय. माझा स्टॅमिना जरा वाढलाय असं मला नवरा म्हणाला. मी घरातली कामं आणि ऑफ़िसातली कामं जास्तं उत्साहाने करु शकते.नाहितर घर सांभाळुन सगळं करणं माझ्या अवाक्याबाहेरचं काम होतं.

सगळ्या गृहिणींनी या चातुर्मासाच्या निमित्ताने आपापलं आरोग्य सुधारण्याचा संकल्प करावा असं मला या एका आठवड्यात प्रकर्षाने जाणवलं. चातुर्मास म्हणजे उपासांची भरमार, एक संपला की दुसरा, प्रत्येक आठवडा उत्सवाच्या दृष्टीने एकदम हॅपनिंग, लागोपाठ सणं त्यासाठी करावे लागणारे नैवेद्य, नैवेद्य तयार होईस्तोवर केलेला उपास..हे सगळं कितीतरी स्ट्रेसफ़ुल असतं?

नुसती फ़ळं खाऊन किंवा दुध पिऊन दिवसभरात होणार्या श्रमांचा परिहार होणे शक्यच नसतं. मग तब्येतीच्या लहानसहान कुरबुरी सुरु होतात. प्रत्येक घरातील स्वयंपाकघराची काळजी त्या त्या घरातली आईच करु जाणे. ती जशी सगळ्यांची काळजी घेते तशीच घरातल्या प्रत्येकाने तिची काळजी घेऊन दिवसातुन तिला १ तास तिच्या तब्येतीसाठी काढायला लावणे हे अतिशय आवश्यक आहे. उपदेश जरा जास्तंच झाला नाही??? ;)

सध्यातरी माझं वजन फ़ारसं कमी झालेलं नाही. जेव्हा कमी होईल तेव्हा भेटुया.. बिफ़ोर आणि आफ़्टर च्या फ़ोटो सकट..एका नविन पोस्ट मध्ये..तोवर विश मी हॅपी जिमिंग. :)

Thursday, August 13, 2009

स्वगत...!!

काही दिवस कसे सुन्न असतात. कशा कशात म्हणुन लक्ष लागत नाही. बरं वाटावं म्हणुन काम करायची केविलवाणी धडपड अजुनच त्रास देवुन जाते. ह्या सगळ्याचं कारण म्हणजे क्षुल्लक कारणावरुन आपल्याच व्यक्तीने हृदयावर उमटवलेले ओरखडे.
अश्याच वेळी मला "एकला चलो रे" कि काय म्हणतात ते आठवतं..आणि जगातलं अगाध तत्वद्न्यान मेंदुचे दरवाजे ठोठावायला लागतं. अगदी श्रीकृष्णापासुन सगळे आठवतात..हे सांगणारे की "एकटेच आला आहात जगात, जमवलेलं हे सगळं गोतावळ पुन्हा कधीतरी सोडुन जायचं आहेच पुढ्च्या वाटचालीसाठी" मग माझंच मला हसु येतं एवढा साक्षात्कार घडवायला मन दुखावलं गेलंच पाहिजे नाहितर आपल्याच धुन्दीत जगणार्‍या मज पामराला एवढी बुदधी होणे नाही..
मला तर हे जगच एक आभास आहे असं वाटतं कधी कधी..मग त्या आभासात दुखावणे काय किंवा सुखावणे काय? सगळे सारखेच..त्या आभासाची जाणीव मात्र अजुन झाली नाहीए..
जाणीव होण्याकरता त्याच्याशी समरुप व्हावं लागत असावं..जगातल्या सगळ्या संतांप्रमाणं..
आपण असाच प्रवास करायचा कधी हसत कधी रडत. आणि एकदिवस संपवायची आपली यात्रा कुणालाही "येतो हं मी" नं सांगता..निमूटपणे.मग कसले ओरखडॆ कसले हसु. सगळे सारखेच होऊन जात असावे. नदी जेव्हा तिच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्तं मोठ्ठ्या सागराला मिळते तेव्हा कुठे सांगत बसते तिला वाटेतील पाषाणांमुळे झालेली दुखापत.
तिचा सागरापर्यंतचा प्रवास हेच तिचं जीवन आणि तिचं त्याच्याशी मीलन हाच मृत्यु...तिच्या पुढच्या वाटचालीची सुरुवात.
सारं जीवन हे त्याच एका मिलनासाठी..मग तिथे मनुष्याठायी असलेले सगळे भाव क्षणात विरघळुन जात असावेत.म्हणुनच मृत्यु साजरा करावा. सुटका म्हणुन नव्हे तर जल्लोष म्हणुन..जल्लोष करावा आत्म्याच्या जगद्व्यापी शक्तिशी होणार्‍या मीलनाचा..
अर्थात, हे सगळं उमगण्यासाठी मन मात्र दुखावलं गेलंच पाहिजे हे नक्की. मनोमन म्हणुनच मी मला कुठल्या नं कुठल्या कारणाने दुखावणार्‍यांचे आभार मानत असते. त्यांच्यामुळेच तर मला अनुभुती होते माझ्यातल्या मी ची...माझ्यातल्या जगद्व्यापी शक्तीच्या अंशाची..!!काही दिवस कसे सुन्न असतात. कशा कशात म्हणुन लक्ष लागत नाही. बरं वाटावं म्हणुन काम करायची केविलवाणी धडपड अजुनच त्रास देवुन जाते. ह्या सगळ्याचं कारण म्हणजे क्षुल्लक कारणावरुन आपल्याच व्यक्तीने हृदयावर उमटवलेले ओरखडे.
अश्याच वेळी मला "एकला चलो रे" कि काय म्हणतात ते आठवतं..आणि जगातलं अगाध तत्वद्न्यान मेंदुचे दरवाजे ठोठावायला लागतं. अगदी श्रीकृष्णापासुन सगळे आठवतात..हे सांगणारे की "एकटेच आला आहात जगात, जमवलेलं हे सगळं गोतावळ पुन्हा कधीतरी सोडुन जायचं आहेच पुढ्च्या वाटचालीसाठी" मग माझंच मला हसु येतं एवढा साक्षात्कार घडवायला मन दुखावलं गेलंच पाहिजे नाहितर आपल्याच धुन्दीत जगणार्‍या मज पामराला एवढी बुदधी होणे नाही..
मला तर हे जगच एक आभास आहे असं वाटतं कधी कधी..मग त्या आभासात दुखावणे काय किंवा सुखावणे काय? सगळे सारखेच..त्या आभासाची जाणीव मात्र अजुन झाली नाहीए.
जाणीव होण्याकरता त्याच्याशी समरुप व्हावं लागत असावं..जगातल्या सगळ्या संतांप्रमाणं..
आपण असाच प्रवास करायचा कधी हसत कधी रडत. आणि एकदिवस संपवायची आपली यात्रा कुणालाही "येतो हं मी" नं सांगता..निमूटपणे.मग कसले ओरखडॆ कसले हसु. सगळे सारखेच होऊन जात असावे. नदी जेव्हा तिच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्तं मोठ्ठ्या सागराला मिळते तेव्हा कुठे सांगत बसते तिला वाटेतील पाषाणांमुळे झालेली दुखापत.
तिचा सागरापर्यंतचा प्रवास हेच तिचं जीवन आणि तिचं त्याच्याशी मीलन हाच मृत्यु...तिच्या पुढच्या वाटचालीची सुरुवात.
सारं जीवन हे त्याच एका मिलनासाठी..मग तिथे मनुष्याठायी असलेले सगळे भाव क्षणात विरघळुन जात असावेत.म्हणुनच मृत्यु साजरा करावा. सुटका म्हणुन नव्हे तर जल्लोष म्हणुन..जल्लोष करावा आत्म्याच्या जगद्व्यापी शक्तिशी होणार्‍या मीलनाचा..
अर्थात, हे सगळं उमगण्यासाठी मन मात्र दुखावलं गेलंच पाहिजे हे नक्की. मनोमन म्हणुनच मी मला कुठल्या नं कुठल्या कारणाने दुखावणार्‍यांचे आभार मानत असते. त्यांच्यामुळेच तर मला अनुभुती होते माझ्यातल्या मी ची...माझ्यातल्या जगद्व्यापी शक्तीच्या अंशाची..!!
काही दिवस कसे सुन्न असतात. कशा कशात म्हणुन लक्ष लागत नाही. बरं वाटावं म्हणुन काम करायची केविलवाणी धडपड अजुनच त्रास देवुन जाते. ह्या सगळ्याचं कारण म्हणजे क्षुल्लक कारणावरुन आपल्याच व्यक्तीने हृदयावर उमटवलेले ओरखडे.

अश्याच वेळी मला "एकला चलो रे" कि काय म्हणतात ते आठवतं..आणि जगातलं अगाध तत्वद्न्यान मेंदुचे दरवाजे ठोठावायला लागतं. अगदी श्रीकृष्णापासुन सगळे आठवतात..हे सांगणारे की "एकटेच आला आहात जगात, जमवलेलं हे सगळं गोतावळ पुन्हा कधीतरी सोडुन जायचं आहेच पुढ्च्या वाटचालीसाठी"

मग माझंच मला हसु येतं एवढा साक्षात्कार घडवायला मन दुखावलं गेलंच पाहिजे नाहितर आपल्याच धुन्दीत जगणार्‍या मज पामराला एवढी बुदधी होणे नाही..

मला तर हे जगच एक आभास आहे असं वाटतं कधी कधी..मग त्या आभासात दुखावणे काय किंवा सुखावणे काय? सगळे सारखेच..त्या आभासाची जाणीव मात्र अजुन झाली नाहीए..

जाणीव होण्याकरता त्याच्याशी समरुप व्हावं लागत असावं..जगातल्या सगळ्या संतांप्रमाणं..

आपण असाच प्रवास करायचा कधी हसत कधी रडत. आणि एकदिवस संपवायची आपली यात्रा कुणालाही "येतो हं मी" नं सांगता..निमूटपणे.मग कसले ओरखडॆ कसले हसु. सगळे सारखेच होऊन जात असावे. नदी जेव्हा तिच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्तं मोठ्ठ्या सागराला मिळते तेव्हा कुठे सांगत बसते तिला वाटेतील पाषाणांमुळे झालेली दुखापत.

तिचा सागरापर्यंतचा प्रवास हेच तिचं जीवन आणि तिचं त्याच्याशी मीलन हाच मृत्यु...तिच्या पुढच्या वाटचालीची सुरुवात.

सारं जीवन हे त्याच एका मिलनासाठी..मग तिथे मनुष्याठायी असलेले सगळे भाव क्षणात विरघळुन जात असावेत.म्हणुनच मृत्यु साजरा करावा. सुटका म्हणुन नव्हे तर जल्लोष म्हणुन..जल्लोष करावा आत्म्याच्या जगद्व्यापी शक्तिशी होणार्‍या मीलनाचा..

अर्थात, हे सगळं उमगण्यासाठी मन मात्र दुखावलं गेलंच पाहिजे हे नक्की. मनोमन म्हणुनच मी मला कुठल्या नं कुठल्या कारणाने दुखावणार्‍यांचे आभार मानत असते. त्यांच्यामुळेच तर मला अनुभुती होते माझ्यातल्या मी ची...माझ्यातल्या जगद्व्यापी शक्तीच्या अंशाची..!!

Wednesday, August 12, 2009

फ़ॉरएवर समर विथ नायजेला!!

काही दिवसांपासुन डिस्कवरी च्या ट्रॅवल लिविंग चॅनेल वर फ़ॉरएवर समर विथ नायजेला हा कार्यक्रम बघतेय...सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा तो कार्यक्रम बघितला तेव्हा नायजेला नावाच्या सुत्रधारीणी ला बघुन आणि इम्प्रेस होऊन..तीचं एखादी पाककृती सांगणं आणि करुन दाखवणं इतकं सुखद असतं की सतत बघत रहावं असंच वाटावं..ती जे पदार्थ करते ते मी मुळीच करु शकणार नाही हे मला माहिती असूनही मी तो कार्यक्रम खुप तन्मयतेने बघत असते.पहिलेपासुनच या सगळ्या कुकरी शो मधली मला आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांचं शो पुरतं मांडलेलं स्वयंपाकघर...पण नायजेला च्या या शो मध्ये ती खर्‍याखुर्‍या स्वयंपाकघरात रेसिपी बनवते.तिची सगळी भांडी, मोठ्ठाजात फ़्रीज, मोठ्ठं ब्लेंडर आणि तिचा बार्बेक्यु..ह्या माझ्या तिच्या स्वयंपाकघरातल्या आवडणार्‍या वस्तु..कुठलाही पदार्थ करत असतांना ती इतकी त्या पदार्थाबद्दल पॅशनेट असते की मलाही आजकाल तिच्यासारखं पॅशनेट होऊन स्वयंपाक करावा वाटतो.........तिने बनवलेले कप केक्स तर इतके सुंदर होते की त्यांना टी.व्ही तुन उचलुन घ्यावं असं वाटलं होतं मला. विशेष म्हणजे सगळी सामग्री तिने कुठुन आणली इथपर्यंत ती सगळा तपशील देत असते. पण नेहमीच्या भारतीय कुकरी शो सारखे सामग्री आणि कृती लिहुन घ्या असं मात्र ती कधीच म्हणत नाही..तिच्या सारखा मला एकही पदार्थ बनवता आला ना तरी मला आनंद होईल...

पुढे काही विडिओज देतेय नक्की पहा..कपकेक वाला विडिओ काही सापडला नाही..;)Wednesday, August 5, 2009

जाहिरातींचं विश्व!! (भाग २)

२००० सालानंतर जाहिरात कंपन्यांमधली स्पर्धा वाढु लागली. त्या स्पर्धेतून उद्भवल्या काही खुप चांगल्या जाहिराती, काही खुप सुमार जाहिराती. जिंगल्स हा प्रकारही याच काळात सुरु झाला.
मध्येच इंग्रजी गाणी टाकुन जाहिराती तयार केल्या जावु लागल्या.the way you make me feel, monte carlo...ची लिसा रे ची जाहिरात मला फ़ार आवडायची.
साध्या सोप्या जिंगल्स मुळे जाहिराती गाण्यासारख्या तोंडात बसु लागल्या. चित्रिकरण ही इतकं नैसर्गिक रित्या केलं असायचं की आपण त्या प्रोडक्ट कडे आकृष्ट नाही झालो तर नवलच. उदाहरण घ्यायचं झालं तर धारा ची लहान मुलाची जाहिरात..."जलेबी???" वाली..रामुकाका आणि त्या लहान मुलाचे संवाद इतके साधे आणि छान की असं कुठल्याही घरात व्हावं.
टायटन ची वडिल आणि मुलीची जाहिरात आणि त्याचं जिंगल तर अजुनही अपीलींग आहे. त्या जाहिराती नंतर कित्येक बाबांनी आपल्या लाडक्या मुलीला टायटन चं घड्याळ घेऊन दिलं असावं लग्नात :) . त्यानंतर टायटन रागा च्या जाहिराती आल्या रानी मुखर्जी वाल्या पण पहिल्या जाहिरातीसारख्या मला भावल्या नाही. आमिर खान ने ही "मंगल पांडे" च्या वेळला टायटन च्या जाहिराती केल्या त्या ही जरा extravagent वाटल्या.
विडीओकॊन washing machine ची जाहिरात "ये धोते, साफ़ करते कपडे भी सुखाते है बस एक ही पल मे आप हो गये तैयार" हे गाणं तर अजुनही आपल्यापैकी बर्याच लोकांना लक्षात असावं...मला हे इतकं आवडायचं की मी बाबांना washing machine घेतांना, विडीओकॊनचीच घ्या म्हणुन आग्रह केला होता.
नंतर whirlpool whirlpool..नी विडीओकॊनपेक्षाही चांगल्या जाहिराती बनवल्या आणि त्यांचा बिजनेस हिरावुन घेतला असं मला वाटतं...
ताजमहाल चहा ची "वाह उस्ताद वाह..अरे हुजुर वाह ताज बोलिये" ही जाहिरात तर खास आठवणीतली, तेव्हा मी गाणं शिकायचे, झाकिर हुसेन चा तबला दाद घेऊन जायचा आणि त्याची केस हलवण्याची स्टाईल भाव खाऊन जायची...
केसांवरुन आठवलं.. हेलो शैम्पूच्या जाहिरातीत मुली केस हलवुन हलवुन चालायच्या मी अनेकदा त्यांची नक्कल करुन चालुन पहायचे..त्यांचे केस कसे हलतात माझे का एवढे हलत नाही हा मला सारखा प्रश्न पडायचा..ही जाहिरात ९० च्या दशकातली बरंका?
त्यानंतर "के झलके दमके दमके" ही क्लिनीक प्लस ची जाहिरात आली आणि माझं शिकाकाईने न्हाणं बंद झालं. त्यात लहान मुलीचे केस क्लिनिक प्लस ने खुप छान झाले असं दाखवल्यामुळे लगेचच माझ्या आणि अनेक
२००० सालानंतर जाहिरात कंपन्यांमधली स्पर्धा वाढु लागली. त्या स्पर्धेतून उद्भवल्या काही खुप चांगल्या जाहिराती, काही खुप सुमार जाहिराती. जिंगल्स हा प्रकारही याच काळात सुरु झाला.
मध्येच इंग्रजी गाणी टाकुन जाहिराती तयार केल्या जावु लागल्या.the way you make me feel, monte carlo...ची लिसा रे ची जाहिरात मला फ़ार आवडायची.
साध्या सोप्या जिंगल्स मुळे जाहिराती गाण्यासारख्या तोंडात बसु लागल्या. चित्रिकरण ही इतकं नैसर्गिक रित्या केलं असायचं की आपण त्या प्रोडक्ट कडे आकृष्ट नाही झालो तर नवलच. उदाहरण घ्यायचं झालं तर धारा ची लहान मुलाची जाहिरात..."जलेबी???" वाली..रामुकाका आणि त्या लहान मुलाचे संवाद इतके साधे आणि छान की असं कुठल्याही घरात व्हावं.
टायटन ची वडिल आणि मुलीची जाहिरात आणि त्याचं जिंगल तर अजुनही अपीलींग आहे. त्या जाहिराती नंतर कित्येक बाबांनी आपल्या लाडक्या मुलीला टायटन चं घड्याळ घेऊन दिलं असावं लग्नात :) . त्यानंतर टायटन रागा च्या जाहिराती आल्या रानी मुखर्जी वाल्या पण पहिल्या जाहिरातीसारख्या मला भावल्या नाही. आमिर खान ने ही "मंगल पांडे" च्या वेळला टायटन च्या जाहिराती केल्या त्या ही जरा extravagent वाटल्या.
"विक्स की गोली लो खिचखिच दुर करो" असं म्हणुन विक्स वाल्यांनी घश्यातल्या खसखशीला योग्य उत्तर दिले..त्यानंतर माझ्यामते कितीतरी दिवसांनी स्ट्रेप्सिल्स आलं बाजारात..
विडीओकॊन washing machine ची जाहिरात "ये धोते, साफ़ करते कपडे भी सुखाते है बस एक ही पल मे आप हो गये तैयार" हे गाणं तर अजुनही आपल्यापैकी बर्याच लोकांना लक्षात असावं...मला हे इतकं आवडायचं की मी बाबांना washing machine घेतांना, विडीओकॊनचीच घ्या म्हणुन आग्रह केला होता.
नंतर whirlpool whirlpool..नी विडीओकॊनपेक्षाही चांगल्या जाहिराती बनवल्या आणि त्यांचा बिजनेस हिरावुन घेतला..पण माझ्यासारखे चाहते आहेतच की विडीओकॊन चे..
ताजमहाल चहा ची "वाह उस्ताद वाह..अरे हुजुर वाह ताज बोलिये" ही जाहिरात तर खास आठवणीतली, झाकिर हुसेन चा तबला दाद घेऊन जायचा आणि त्याची केस हलवण्याची स्टाईल भाव खाऊन जायची...
केसांवरुन आठवलं.. हेलो शैम्पूच्या जाहिरातीत मुली केस हलवुन हलवुन चालायच्या मी अनेकदा त्यांची नक्कल करुन चालुन पहायचे..त्यांचे केस कसे हलतात माझे का एवढे हलत नाही हा मला सारखा प्रश्न पडायचा..ही जाहिरात ९० च्या दशकातली बरंका?
त्यानंतर "के झलके दमके दमके" ही क्लिनीक प्लस ची जाहिरात आली आणि माझं शिकाकाईने न्हाणं बंद झालं. त्यात लहान मुलीचे केस क्लिनिक प्लस ने खुप छान झाले असं दाखवल्यामुळे लगेचच माझ्या आणि अनेक इतर मातांनी क्लिनिक प्लस वापरणं सुरु केलं..जाहिरातीचा प्रताप...आत्ता कळतंय की त्या जाहिरातीत स्पेशल इफ़ेक्ट्स वापरलेत त्यामुळे त्यांचे केस छान दिसले माझ्या केसांची प्रत मात्र सुमार झाली..
क्लिएरसिल च्या पुरळ दूर करणार्या क्रिमची जाहिरात तर कुठेतरी गायबच झाली..तेव्हा काय क्रेज असेल नाही महाविद्यालयीन युवक युवतींमधे या क्रिमची..खपलं नसावं बहुधा ;)
बरं आठवलं...फ़ेअर एण्ड लवली ने तर माझ्या लहानपणापासुन, मुलींना गोरं बनवण्याचा दावा केला आहे. असं खरंच जर झालं असतं तर भारतात कुणी मुलगी सावळी दिसलीच नसती..आणि आता तर त्यांनी मुलांना पण गोरं करायचा चंग बांधलाय..
लक्स च्या जाहिरातींबद्दल न लिहिलेलंच बरं...सगळ्यांना सगळंच माहित आहे...आणि हो संतूर साबणामुळे वय कमी दिसतं म्हणे, प्रात्यक्षिक करुन बघायला मला थोडं मोठं व्हावं लागेल..तोवर काही बोलता येणार नाही ;)
मोबाईलच्या युगात मात्र चढाओढीने प्रत्येक सर्विस प्रोवायडर ने आपापली जाहिरात एकदम छान बनवायचा प्रयत्न केलाय.
ए. आर रेहमानचे एअरटेल वाले सगळेच जिंगल्स मला प्रचंड आवडतात. वोडाफ़ोनचे झू झू च तर तूफ़ानच..त्यांच्यावर मी कितीतरीदा खळाळून हसलेय..वोडाफ़ोनच्या पग च्या जाहिरातींबद्दल तर महेंद्रजींनी लिहलंच आहे....आयडियाची "walk when you talk" तर खरंच छान आहे. सगळयाच कंपन्या चांगल्या, सगळ्यांचे प्रोडक्टही जाहिरातीनुसार चांगले..बापडा "कंस्युमर" काय करणार? कुठलं प्रोडक्ट विकत घेणार?
कोलगेट आणि पेप्सोडेंट च्या छोट्या पेस्ट वर ३ रु कमी असतात बरंका? असंच त्यांच्या हल्लीच्या नवीन जाहिराती सांगतात. हा ही एक प्रयत्न आपले प्रोडक्ट्स खपवायचा..कोलगेट पेक्षा पेप्सोडेण्ट ची"काहीही खा खरं बोला" ही जाहिरात मात्र पटण्यासारखी आहे.
पेप्सी, कोक , थम्स अप च्या जाहिरातींना "emergency lemon refresher LMN LMN LMN" नी चोख उत्तर दिलंय..जाहिरात पण एकदम मराठमोळी...
ह्या आणि अश्या अनेक मला आवडणार्या जाहिराती..कधी कंटाळा आला नं की बसते रिमोट घेऊन कुठल्या चैनेल वर कुठली जाहिरात सुरु आहे बघत. आयुष्यात येणार्या माझ्या भावी भुमिकांसकट, सगळ्याच भुमिका बघतांना मी ही त्या जाहिरातीतल्याच एखाद्या पात्रासारखी होऊन जाते.....आपणही रोज प्रत्येक भुमिकेत जाहिरातींसारखेच थोड्या थोड्या वेळ वावरत असतो..नाही?

आजकाल जाहिराती तयार करण्यात बैंक्स पण मागे नाहित.. "मेरे देस मे पैसा सिर्फ़ पैसा नहि है" असं म्हणुन आय एन जी वैश्य वाल्यांनी एकदम सही अपील केली आहे..नदीत पैसे टाकणारा आणि ते पैसे काढणारा मुलगा, रेल्वेच्या रुळावर पैसा ठेवुन आवाज ऐकणारी मुलगी, लग्नाच्या वरातीत नवर्या मुलाला घातलेला पैश्यांचा हार..कुणाला आवडणार नाही बरं ही जाहिरात.

पेप्सी, कोक , थम्स अप च्या जाहिरातींना "emergency lemon refresher LMN LMN LMN" नी चोख उत्तर दिलंय..जाहिरात पण एकदम मराठमोळी...

ह्या आणि अश्या अनेक मला आवडणार्या जाहिराती..कधी कंटाळा आला नं की बसते रिमोट घेऊन कुठल्या चैनेल वर कुठली जाहिरात सुरु आहे बघत. आयुष्यात येणार्या माझ्या भावी भुमिकांसकट, सगळ्याच भुमिका बघतांना मी ही त्या जाहिरातीतल्याच एखाद्या पात्रासारखी होऊन जाते.....आपणही रोज प्रत्येक भुमिकेत जाहिरातींसारखेच थोड्या थोड्या वेळ वावरत असतो..नाही?

Monday, August 3, 2009

जाहिरातींचं विश्व!!

बर्याच जाहिरातींना आपण नावं ठेवतो. मला काही जाहिराती अजिबात आवडत नाहीत. पण एखादी जाहिरात इतकी डोकं लावुन तयार केलेली असते की तिला दाद दिल्याशिवाय राहवत नाही. लहानपणी पासुन मला प्रत्यक्ष कार्यक्रमापेक्षा जाहिराती बघणंच आवडत असे. कृष्ण-धवल टि.व्ही च्या जमान्यात रात्रीच्या बातम्यांनंतर एखादी मालिका असायची. त्यातही एकच विश्रांती असायची. त्या एकाच विश्रांती साठी तो अख्खा कार्यक्रम बघणे हा माझा नित्याचा कार्यक्रम. जाहीरातीचं विश्व तेव्हा फ़ारसं मोठ्ठं नव्हतं. निवडक प्रोड्क्ट्स च्या निवडक जाहीराती. त्यात कोलगेट, प्रॊक्टर आणि गैम्बल, पामोलिव, गोदरेज, सनड्रोप,सर्फ़ अश्या काही जाहीराती मला आठवतात. सर्फ़ ची ललिता जी वाली जाहिरात तर झकासच...
मला लेसान्सी नावाच्या साबणाची जाहीरात आवडायची. त्यातील "लेसान्सी, खुब चले चलती जाये" आणि "राहुल, पानी चला जायेगा" ही वाक्य तर मला अजुनही आठवतात. त्या साबणाच्या वेगळ्या आकारामुळे तर मी हट्ट करुन बाबांना ती साबण आणुन मागायचे. आता "वो खुब चली की नही" हे मात्र आता आठवत नाही ;)
निरमा पावडर ची जाहीरात तर लहान थोरांना माहीती आहेच. मला "निर्मा सुपर निली डिटर्जंट टिकीया" वाली दिपिका(सीतेची भुमिका करणारी) ची जाहिरात अजुनही पाठ आहे.
दुकानदार: आईये आईये दिपिका जी लिजिए आपका सब सामान तयार.....
दिपिका: ये नही वो .निर्मा सुपर निली डिटर्जंट टिकीया..
दुकानदार: मगर आप तो वो हमेशा महेंगीवाली टिकीया...लेती थी..
दिपिका: मगर वही मेहेंगे दामोवाली क्वालिटी वही सफ़ेदी वही झाग अगर कम दामो मे मिले तो कोइ ये क्यु ले..वो ना ले?
दुकानदार: मान गये.... किसे?आपकी पारखी नजर और निरमा सुपर दोनोको..
आमच्या घरी निरमा साबण मात्र कधी कुणीही वापरल्याचं मला आठवत नाही...जाहीरातीमुळे खप जरी नसेल वाढला तरी आज २० वर्षांनंतरही मला ती जाहिरात लक्षात आहे ह्यातच जाहीरात तयार करणार्यांचं श्रेय आहे नाही का?
काहीवेळा जुनी गाणी सुध्दा वापरली आहेत जाहिरातीत आणि गम्मत म्हणजे गाणी गुणगुणतांना जाहिरातच कितीतरी दा गुणगुणल्या जाते माझ्याकडुन..उदा.विडिओकॊन च्या रेफ़्रीजरेटर ची जाहीरात..
भली भली सी एक सुरत भला सा एक नाम
हर मौसम मे काम आये सुबह हो या शाम
कौन है वो हमसफ़र..जेट मैटीक रेफ़्रीजरेटर..
गाण्यापेक्षा जाहिरातीच गुणगुणायला जास्त मजा यायची..मला तर अजुनही मजा वाटते.....
थोडी मोठी झाले आणि "रफ़ल्स लेस रफ़ल्स लेस...नो वन कैन ईट जस्ट वन" ह्या जाहीरातीने भारतीयांच्या तोंडात चिप्स भरवले कारण यानंतरच लेज चिप्स चं प्रस्थ सुरु झालं.लैकमे च्या जाहीराती तर मला त्यात दाखवत असलेल्या सुंदर सुंदर मोडेल्स आणि कोस्मेटिक्स मुळे प्रचंड आवडायच्या. ऐश्वर्या राय ची ही जाहिरात पहा
"I am Sanjana, got another pepsi" ही ऐश्वर्या आणि आमिर ची जाहीरात..आठवणीतल्यापैकी एक....
२००० सालापर्यंत जाहिरातींचं विश्व बरंच फ़ोफ़ावलं, नविन नविन आयडियास आणि नव्या नव्या तांत्रिकी सुधारणांमुळे प्रत्येक जाहिरात अपीलिंग करायचा जसा काही जाहिरात कंपन्यांनी चंगच बांधला...
क्रमश:
बर्याच जाहिरातींना आपण नावं ठेवतो. मला काही जाहिराती अजिबात आवडत नाहीत. पण एखादी जाहिरात इतकी डोकं लावुन तयार केलेली असते की तिला दाद दिल्याशिवाय राहवत नाही. लहानपणी पासुन मला प्रत्यक्ष कार्यक्रमापेक्षा जाहिराती बघणंच आवडत असे. कृष्ण-धवल टि.व्ही च्या जमान्यात रात्रीच्या बातम्यांनंतर एखादी मालिका असायची. त्यातही एकच विश्रांती असायची. त्या एकाच विश्रांती साठी तो अख्खा कार्यक्रम बघणे हा माझा नित्याचा कार्यक्रम.

जाहीरातीचं विश्व तेव्हा फ़ारसं मोठ्ठं नव्हतं. निवडक प्रोड्क्ट्स च्या निवडक जाहीराती. त्यात कोलगेट, प्रॊक्टर आणि गैम्बल, पामोलिव, गोदरेज, सनड्रोप,सर्फ़ अश्या काही जाहीराती मला आठवतात. सर्फ़ ची ललिता जी वाली जाहिरात तर झकासच...